स्मृती मानधनाच्या वडिलांना डिस्चार्ज; आता कधी होणार पलाशचे लग्न, 'व्हायरल चॅट'ने वाढवली गुंतागुंत?

Smriti Mandhana Wedding Update : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिचे गायक आणि संगीतकार पलाश मुच्छाल याच्यासोबतचे नियोजित लग्न तिच्या वडिलांच्या अचानक बिघडलेल्या प्रकृतीमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. श्रीनिवास मानधना यांना लग्नाच्या दिवशीच रुग्णालयात दाखल करावे लागल्याने हा सोहळा थांबवण्यात आला होता.

वडिलांना डिस्चार्ज, पण लग्नाची तारीख नाही

चार दिवसांच्या उपचारानंतर स्मृती मानधना यांचे वडील रुग्णालयातून घरी परतले आहेत. त्यांच्या प्रकृतीचा विचार करूनच लग्न स्थगित करण्यात आले होते. वडिलांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे, की आता लवकरच लग्नाची नवी तारीख जाहीर होईल का?

जेव्हा लग्न स्थगित करण्यात आले, तेव्हा स्मृतीच्या व्यवस्थापकाने स्पष्ट केले होते की, वडिलांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत लग्न होणार नाही. वडिलांचे आरोग्य सुधारले असले तरी, लग्नाच्या तारखेबाबत सध्या कोणतीही नवीन चर्चा झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लग्न अजूनही लांबणीवर आहे.

Smriti Mandhana Wedding Update

चर्चेचा बाजार तापवणारे 'व्हायरल चॅट'

एकीकडे लग्नाच्या अनिश्चिततेमुळे चाहते चिंतेत असताना, दुसरीकडे कथित 'व्हायरल चॅट'मुळे या प्रकरणात आणखी गुंतागुंत वाढली आहे. पलाश मुच्छाल यांच्यावर एका मुलीसोबत झालेल्या कथित चॅटचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये त्याने त्या मुलीला पोहण्यासाठी आमंत्रित केल्याचे दिसत आहे. या 'व्हायरल चॅट'च्या पार्श्वभूमीवर, पलाशलाही मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी पलाशची बहीण आणि आई यांनी प्रतिक्रिया दिली आहे, मात्र स्मृती मानधनाचे कुटुंब आणि खुद्द स्मृतीने यावर कोणतेही विधान केलेले नाही. ते अजूनही गप्प आहेत.

'चॅट'वरील अस्पष्टता

पलाशच्या कुटुंबीयांनी व्हायरल झालेल्या चॅट स्क्रीनशॉट्सवर कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. मेरी डिकोस्टा नावाच्या एका अकाउंटने हे चॅट इंस्टाग्रामवर व्हायरल केले होते. नंतर तिने स्पष्ट केले की, ज्या मुलीशी पलाशचा हा संवाद झाला आहे, ती 'मी नसून दुसरी कोणीतरी' आहे. हा कथित संवाद या वर्षी मे महिन्यात झाला होता.

सोशल मीडियावरील स्थिती

लग्नाच्या अफवा आणि व्हायरल चॅटमुळे स्मृती मानधनाने पलाशला इंस्टाग्रामवर फॉलो करणे बंद केले आहे, अशाही अफवा पसरल्या होत्या. मात्र, हा दावा खोटा ठरला आहे. स्मृती आणि पलाश अजूनही एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करत आहेत.

सध्या, श्रीनिवास मानधना यांच्या आरोग्यात सुधारणा झाली असली तरी, व्हायरल चॅट आणि दोन्ही कुटुंबांचे मौन यामुळे स्मृती-पलाशच्या लग्नाची परिस्थिती अजूनही अस्पष्ट आहे आणि चाहत्यांना पुढील घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+