स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाची तारीख आणि ठिकाण आले समोर; तिच्या पतीची जात कोणती?
Smriti Mandhana Palash Muchhal Wedding Date : भारतीय महिला क्रिकेट संघाची 'हिटमॅन' आणि स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार पलाश मुच्छल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या बहुप्रतिक्षित लग्नाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असून, लग्नाच्या तारखेसह अन्य रंजक तपशीलही समोर आले आहेत.
लग्नाची निश्चित तारीख आणि ठिकाण
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली असून, विविध अफवांना पूर्णविराम देत, हे जोडपे २३ नोव्हेंबर रोजी विवाहबद्ध होणार आहे. महाराष्ट्रातील सांगली या ठिकाणी हा सोहळा पार पडणार आहे.
सोशल मीडियावर १९ आणि २० नोव्हेंबर अशा दोन तारखांच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र २३ नोव्हेंबर ही खरी तारीख आहे. अनेक दिवसांपासून चाहते या लग्नाची वाट पाहत होते आणि आता लवकरच हे दोघे पती-पत्नी होणार आहेत.

पलाश मुच्छल यांची जात कोणती?
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या जात-धर्माबद्दल असलेल्या शंकांचे निरसन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही एकाच जातीचे आहेत. स्मृती मानधना ही मारवाडी समाजाच्या माहेश्वरी जातीच्या आहेत. तर पलाश मुच्छल देखील माहेश्वरी समुदायाचे आहेत.
अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे अध्यक्ष संदीप काबरा यांनी याची पुष्टी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की स्मृती आणि पलाश दोघेही माहेश्वरी समाजाचे आहेत. आंतरजातीय विवाहाला परवानगी नसलेल्या या समाजात, दोघांनी एकाच जातीत लग्न करून परंपरा जपली आहे.
दिडवाना कनेक्शन: कुलदेवीला मान
लग्नाच्या पत्रिकांसंबंधी एक अत्यंत मनोरंजक आणि पारंपारिक गोष्ट समोर आली आहे. राजस्थानातील दिडवाना. दिडवानाची सुर्ल्या देवी ही मंधाना आणि मुच्छल या दोन्ही कुटुंबांची कुलदेवी आहे. मंधानाचे कुटुंब राजस्थानमधून स्थलांतरित होऊन महाराष्ट्रातील सांगली येथे स्थायिक झाले, तर पलाशचे कुटुंब दिडवानाहून इंदूरमध्ये स्थायिक झाले.
मारवाडी समाज व्यावसायिक कारणांमुळे देशभरात पसरला असला तरी, या दोघांचे पूर्वज दिडवानाचे होते. स्थलांतरानंतरही या दोन्ही कुटुंबांनी आपल्या कुलदेवीवरची श्रद्धा कायम ठेवली आहे आणि म्हणूनच शुभकार्यापूर्वी कुलदेवीला पहिली लग्नपत्रिका अर्पण करण्याची परंपरा पाळली गेली.
स्मृती आणि पलाश: ओळख आणि संबंध!
स्मृती आणि पलाश यांचा संबंध नवीन नाही. हे दोघे एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतात. महिला विश्वचषक फायनल दरम्यान पलाश मुंबईत उपस्थित होता. विजयानंतर स्मृतीसोबत ट्रॉफी घेऊन हसतानाचा दोघांचा एक फोटोही व्हायरल झाला होता. माहितीनुसार, स्मृती आणि पलाश यांचे आधीच साखरपुडा झालेला आहे, आणि आता ते सामाजिकरित्या लग्नाच्या बंधनात अडकत आहेत
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस











Click it and Unblock the Notifications