Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

स्मृती मानधना देशाची दुसरी सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर! बनतेय फॅशन क्विन, संपत्ती किती? जाणून घ्या

Smriti Mandhana : महाराष्ट्राची कन्या स्मृती मानधना भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर ठरली आहे, महाराष्ट्रातील सांगलीची रहिवासी असलेली स्मृतीने महाराष्ट्रासोबत देशाचे नाव जगात उंचावले आहे. भारतीय महिला संघाची ती प्रमुख आधारस्तंभ आहे, तिने आपल्या खेळीने अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहे.

स्मती क्रिकेटमध्ये तर अनेक विक्रम केले आणि नाव कमावतच आहे, पण फॅशनलच्या दुनियेतही ती काही कमी नाही. भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू म्हणून तिला मान मिळाला आहे. आज आपण तिचे वैयक्तिक जीवन, क्रिकेट करीअर आणि एकूण संपत्ती किती आहे हे जाणून घेऊया.

Smriti Mandhana

स्मृती मानधना जशी मैदानात उत्कृष्ट कामगिरी करते तशीच ती फॅशनमध्येही काही कमी नाही, फॅशनमध्ये तिने आपली झलक दाखवली आहे. ती पाहताच अनेकजण क्लिन बोल्ड होतात. स्मृती मानधना हिच्या यशामागे तिचे वडील आहेत, कारण ते एक जिल्हास्तरीय क्रिकेटपटू होते.

हरमनप्रीतनंतर मानधना सर्वात श्रीमंत

स्मृती मंधानाने देशातील सर्वात श्रीमंत क्रीडापटूंपैकी एक म्हणून आता तिचा नवा परिचय होणार आहे. अलीकडील एका अहवालानुसार, हरमनप्रीत कौरनंतर ती आता भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

स्मृतीची संपत्ती किती आहे?

महाराष्ट्राची कन्या स्मृती मानधना हिची अंदाजे 30 कोटींहून अधिक निव्वळ संपत्ती आहे, ती तिच्या केंद्रीय BCCI करार, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि सतत विस्तारत असलेल्या महिला प्रीमियर लीग WPL मधून येते.

स्मृतीचा फॅशन लूक

स्मृती मानधना हिचा फॅशन-फॉरवर्ड लूक आता जीवनशैली आणि मनोरंजन विभागांवरही वर्चस्व गाजवत आहे.मैदानाबाहेर, स्मृती मानधना झपाट्याने स्टाईल आयकॉन बनत आहे. सणासुदीच्या कार्यक्रमात पारंपारिक पोशाख, आणि आवश्यक तिथे आवश्यक अनुरुप पोषाखासाठी ती प्रसिद्ध होत आहे. इन्स्टार्गामवरील तिच्या पोस्ट आणि फोटोवरुन फॅशनच्या क्षेत्रात तिचा वाढता प्रभाव सिद्ध होतो.

ब्रँड अन् फॅशन फिगर म्हणून ओळख

पाश्चात्य आणि भारतीय दोन्ही पोशाखांमध्ये तिच्या कृपा आणि आत्मविश्वासपूर्ण शैलीचे चाहत्यांनी कौतुक केल्याने गॅलरीला प्रचंड आकर्षण मिळाले आहे. स्मृती मानधना यांच्या यशामागे व्यावसायिक शक्ती स्मृती मानधना ही जबरदस्त फलंदाजीसोबतच ती एक ब्रँड आहे, एक फॅशन फिगर म्हणून ओळखली जात आहे. ती भारतातील महिला खेळाडूंमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या ब्रँड ॲम्बेसेडरपैकी एक आहे.

कोण आहे स्मृती मानधना, सर्व माहिती

स्मृती श्रीनिवास मानधना हिचा जन्म 18 जुलै 995 रोजी झाला. ती भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. मानधना डाव्या हाताने फलंदाजी करते तर उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते. डब्ल्यूपीएल स्पर्धेत ती रॉयल चॅलेंजर्स, बेंगलोर या संघाकडून खेळणार आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये ती महाराष्ट्र राज्याकडून खेळते.

स्मृतीचे वैयक्तिक आयुष्य

18 जुलै 1996 मध्ये मुंबई येथे स्मृतीचा जन्म झाला, तिच्या आईचे नाव स्मिता आणि वडिलांचे नाव श्रीनिवास आहे. स्मृती दोन वर्षांची असताना तिचे कुटुंब माधवनगर, सांगली येथे राहण्यास आले. तिचे वडील आणि भाऊ, श्रावण दोघेही सांगली जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय किक्रेट खेळत होते. भावाला महाराष्ट्र राज्य 16 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत खेळताना पाहून स्मृतीला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली.

स्मृतीची क्रिकेट कारकीर्द

नवव्या वर्षी स्मृतीची महाराष्ट्राच्या 15 वर्षे वयाखालील संघामध्ये निवड झाली. अकराव्या वर्षी स्मृतीची महाराष्ट्राच्या 19 वर्षे वयाखालील संघामध्ये निवड झाली. ऑक्टोबर 2013 मध्ये ती एक दिवसीय सामन्यात द्विशतक करणारी पहिली भारतीय महिला ठरली. पश्चिम विभाग 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत बडोदा येथे गुजरातविरुद्ध महाराष्ट्राकडून खेळताना तिने 150 चेंडूत नाबाद 224 धावा केल्या. 2016 मध्ये विमेन्स चॅलेंजर ट्रॉफीमध्ये खेळताना मानधनाने इंडिया रेड संघासाठी तीन सामन्यांमध्ये तीन अर्धशतके केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+