Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाने पार केला ७ हजार धावांचा टप्पा

Mumbai: क्रिकेट हा भारताचा धर्म आहे, असं म्हणतात. कोट्यावधी भारतीय क्रिकेटचा आनंद घेतात. भारत जिंकला की जल्लोष करतात, भारताचा पराभव झाला की दुखात बुडून जातात. टी-२० असो, एक दिवसीय क्रिकेट असो, की कसोटी सामना, क्रिकेटच्या प्रत्येक फॉर्मवर भारतीयांचं तितकंच प्रेम आहे.

भारतीय क्रिकेटपटूनीही आपल्या रसिकांना भरपूर आनंद दिला आहे. १९८३ साली भारताने वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केले. कर्णधार कपिल देवने उंचावलेला विश्वचषक भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनात कायमचा कोरला गेला आहे.

smriti mandhana

सुनील गावस्कर, के श्रीकांत, रवी शास्त्री, सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, सौरभ गांगुली, वीरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, महेंद्र सिंग धोनी, युवराज सिंग, जसप्रीत बुमरा, विरत कोहली यांनी भारतीयांना क्रिकेटचा निखळ आनंद दिला. १९८३ नंतर थेट २०११ साली भारताने विश्वचषक जिंकला. १९९६ साली उपांत्य सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. २००३ आणि २०२३ साली अंतिम सामन्यात भारत पराभूत झाला.

महिला क्रिकेट संघाचा दबदबा

भारताच्या पुरुष संघाप्रमाणेच महिला क्रिकेट संघ देखील आपला दबदबा टिकवून आहे. मिथाली राज ही तमाम महिला क्रिकेटपटूची आदर्श. तिने आपल्या चौफेर खेळीने महिला क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. मराठमोळी स्मृती मानधना देखील आता त्याच वाटेवर आहे. आपल्या स्मृतीने नुकताच एक विक्रम केला आहे.

स्मृती मानधना ही भारताची सलामीवीर आहे. धडाकेबाज खेळीसाठी ती प्रसिद्ध आहे. सोशल मिडीयावर देखील तिचे असंख्य चाहते आहेत. बेंगळूरू येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात तिने ७ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. एकदिवसीय अंतर राष्ट्रीय क्रिकेट सामन्यात हा टप्पा गाठणारी ती दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

मिथालीच्या राजच्या नावावर दहा हजार धावा

माजी कप्तान मिथाली राज हिच्या नावावर एक दिवसीय क्रिकेट सामन्यात १० हजार ८६८ धावांची नोंद आहे. या सामन्यात स्मृती हिने १२७ चेंडूत ११७ धावांची झंझावाती खेळी केली. यात १२ चौकार आणि एक षटकार याचा समावेश आहे. भारतात तिचे हे पहिले आणि आफ्रिकेविरुद्धचे दुसरे शतक आहे. आपल्या क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत स्मृतीने ६ एक दिवसीय शतके झळकावली आहेत.

भारताची सध्याची कर्णधार हरमन प्रीत कौर हिच्या नावावर ६ हजार ८७० धावांची नोंद आहे. तिला ७ हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी १३० चावांची आवश्यकता आहे. ती देखील लवकरच ७ हजारी मनसबदार ठरण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+