T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिंगापूरने इतिहास रचला; मंगोलियाचा संघ 10 धावांवर केला ऑलआऊट
Singapore VS magnolia T20 match : सिंगापूरने T20 क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. सिंगापूरने T20 विश्वचषक पात्रता फेरीत मंगोलियाला सर्वात कमी धावसंख्येवर बाद केले. हा एक जागतिक विक्रम मानला जात आहे. मंगोलिया सर्वात कमी धावसंख्येवर बाद होणारा संघ ठरला आहे. सिंगापूरने मंगोलिया 10 धावांवर ऑलआउट केले.
सिंगापूरचा कर्णधार मनप्रीत सिंगने मंगोलियाला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले. तर सिंगापूरच्या गोलंदाजांनी स्फोटक गोलंदाजी करत मंगोलियाला सर्वात कमी धावसंख्येवर बाद केले. स्पेनविरुद्ध 10 धावांवर बाद झालेल्या आयल ऑफ मॅनसह मंगोलिया देश ठरला.

फिरकीपटू हर्ष भारद्वाजने मंगोलियाला सर्वात जास्त धो धो धुतले. चार षटकात 6/3 घेत T20 मध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी केली. त्याच्याशिवाय अक्षय पुरी (2/4), राहुल शेषाद्री (1/2) आणि रमेश कालिमुथू (1/1) यांनी उर्वरित चार विकेट घेत आपल्या संघासाठी शानदार गोलंदाजी केली.
मंगोलियन संघ केवळ 10 षटके खेळू शकला आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील संयुक्त सर्वात कमी धावसंख्येवर बाद झाला.प्रत्युत्तरात सिंगापूरने सामना संपायला फक्त पाच चेंडू घेतले आणि 13 धावा करून लक्ष्य गाठले.
प्रत्युत्तरात खेळत असताना सिंगापूरचा कर्णधार मनप्रीत सिंग गोल्डन डकवर बाद झाला. मात्र, राहुल शर्माने (2 चेंडूत 7*) पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून मंगोलियाच्या सर्व आशा मोडून काढल्या. नंतर, विल्यम सिम्पसनने (2 चेंडूत 6*) दोन धावा आणि चौकार मारून सामना शानदारपणे संपवला.
याआधी देखील आइल ऑफ मॅन फेब्रुवारी 2023 मध्ये सहाव्या टी-20 सामन्यात स्पेनविरुद्ध अवघ्या 10 धावांनी गडगडले होते. ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या होती पण आता मंगोलियाही या यादीत सामील झाला आहे. सर्वात कमी गुणांच्या बाबतीत आयल ऑफ मॅन आणि मंगोलिया सारख्याच स्थानावर येऊन थांबले आहेत.












Click it and Unblock the Notifications