आता रोहित नाही तर शुभमन गिल भारताचा कर्णधार असेल! न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी मोठी अपडेट
Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप अ मधील शेवटच्या सामन्याआधी भारतीय संघात मोठा बदल दिसून येतोय. संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे विश्रांती दिली जाऊ शकते, असे संकेत आहेत. अशा परिस्थितीत शुभमन गिलला या महत्त्वाच्या सामन्यात भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते.
रविवारी दुबईमध्ये होणारा हा सामना खूप रोमांचक असणार आहे. उपांत्य फेरीतील दोन्ही संघांची ठिकाणे आधीच निश्चित झाली असली तरी या सामन्याचे महत्त्व अजूनही कायम आहे.

रोहित शर्मासाठी फिटनेसचे संकट
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान रोहित शर्माला दुखापत झाली होती. तेव्हापासून त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दुबईमध्ये होणाऱ्या आगामी उपांत्य सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी हा एक महत्त्वाचा निर्णय बनला आहे. रोहितच्या दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्याचा विचार सुरू आहे. रोहितच्या जागी ऋषभ पंत किंवा वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकते.
शुभम गिलकडे नेतृत्व करण्याची क्षमता
गेल्या काही वर्षांत शुभमन गिलने गुणवत्ता आणि नेतृत्व क्षमता ओळखली गेली आहे. त्याने आयपीएल 2024 मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले आहे. तसेच झिम्बाब्वे विरुध्द एका मालिकेसाठी भारतीय संघाचे विजयी नेतृत्व केले होतं. या अनुभवामुळे तो आता संघासाठी एक मजबूत पर्याय बनला आहे. तसेच या स्पर्धेत गिलची उत्कृष्ट कामगिरी, बांगलादेशविरुद्धचे शतक आणि पाकिस्तानविरुद्धचा प्रभावी खेळ. यामुळे त्याचे नेतृत्व कौशल्य आणखी बळकट झालं आहे.
उपांत्य फेरीची तयारी
भारताच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी या सामन्यात रोहितला विश्रांती देण्याचा निर्णय खेळाडूंचा फिटनेस राखण्यासाठी घेण्यात येत आहे. गिलचे नेतृत्व भारताच्या क्रिकेट इतिहासात एक नवीन दिशा देऊ शकते, जे या स्पर्धेत संघाची सखोलता दर्शवते. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना 2 मार्च रोजी खेळला जाईल.












Click it and Unblock the Notifications