Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शुभमन गिलची संपत्ती किती, आधी सारा नंतर रिद्धीमासोबत होते लव्ह अफेअर, वाचा शुभमनची लाईफ जर्नी

Shubman Gill Net Worth : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात धडाकेबाज सलामीवीर शुभमन गिलने शानदार कामगिरी केली. गिलने नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्याचे स्फोटक एकदिवसीय शतक झळकावले. चला तर जाणून घेऊया, शुभमन गिलच्या करिअरविषयी अन् त्याच्या जीवनाविषयी सविस्तर..!

शुभमन गिलचा जन्म कुठे झाला, फॅमिलित कोण असते?

भारतीय युवा क्रिकेटपटू गिलने लहानपणापासूनच चांगली कामगिरी करायला सुरुवात केली आणि अल्पावधीतच त्याला प्रसिद्धी मिळाली. गिल यांचा जन्म 8 सप्टेंबर 1999 रोजी पंजाबमधील फाजिल्का येथे झाला. त्याचे वडील लखविंदर सिंग शेतकरी आहेत. त्याची आई किरत गिल गृहिणी आहे. त्याला शाहनील गिल नावाची एक मोठी बहीण आहे. गिल क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी त्याच्या कुटुंबाचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत शेती होता.

शुभमन गिलची एकूण संपत्ती किती आहे?

शुभमन गिलची एकूण संपत्ती सुमारे 34 कोटी रुपये आहे. त्याचा बीसीसीआयसोबत ग्रेड ए करार आहे, ज्याअंतर्गत त्याला टीम इंडियाकडून खेळण्यासाठी दरवर्षी 5 कोटी रुपये मिळतात.

याशिवाय, गिल गुजरात टायटन्सकडून दरवर्षी 8 कोटी रुपये कमावतो. याशिवाय, गिल वेगवेगळ्या ब्रँड्सना मान्यता देऊन भरपूर पैसे कमवतो. गिल प्रत्येक टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी 3 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करतो.

Shubman Gill Net Worth

शुभमन कसा वाटतो? रिद्धीमाने सांगितले...

रिद्धीमा पंडित शुभमन गिलपेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. या वर्षाअखेरीस हे दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. 'फिल्मीज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीत रिद्धीमाने सांगितले की, एकतर मी शुभमनला ओळखत देखील नाही. तो एक चांगला खेळाडू आहे, एवढंच मला माहित आहे.

मात्र, माझी आणि त्याची काही वैयक्तिक ओळख नसल्याचे रिद्धीमाने सांगितले. मला जर शुभमनला भेटण्याची संधी मिळाली तर मी नक्कीच त्याच्या सोबत चर्चा करेल. शुभमन मला खूप म्हणजे खूपच क्यूट वाटत असल्याचे रिद्धीमाने यावेळी सांगितले.

डेटिंगच्या चर्चा म्हणजे पब्लिसिटी स्टंट तर नाही ना?

दरम्यान, या आधी रिद्धीमाने 'हिंदुस्थान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, आता मी अशा बातम्यांवर काय प्रतिक्रिया देऊ? जे खरं आहे ते मला माहित आहे. मी या मुद्याला अधिक महत्त्व देणार नाही. मीच अशा मुद्यांना महत्त्व दिलं तर तो वेडपणा ठरेल असे रिद्धीमाने म्हटले. पब्लिसिटी स्टंट करायचा होता तर मी बिग बॉस मध्ये गेली असती. मी त्या शोमध्ये राहूनच कोणाचेही नाव घेतले असते आणि पब्लिसिटी केली असती. पण, मला हे पसंत नसल्याचेही रिद्धीमाने सांगितले.

सारासोबतच्या रिलेशनशिपची चर्चा....

याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्यासोबतही शुभमन गिलचे नाव जोडले गेले होते. अभिनेत्री सारा अली खानने यावर भाष्य करताना हे या चर्चा निराधार असल्याचे म्हटले होते. तर, सारा तेंडुलकर अथवा सचिन तेंडुलकरने किंवा शुभमन गिलनेही कधीही कोणतेही भाष्य केले नाही.

रिद्धीमा पंडित कोण आहे?

रिद्धीमा पंडित छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रिद्धीमा बिग बॉस ओटीटीमध्येही दिसली आहे. रिद्धीमाने 'बहू हमारी रजनीकांत' आणि 'खतरा खतरा' यांसारख्या टेलिव्हिजन शोमध्ये काम केलं आहे. बहू हमारी रजनीकांत या टीव्ही मालिकेमध्ये तिने रोबोटची भूमिका साकारली होती, ज्यामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. यानंतर ती ओटीटी बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्येही दिसली होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+