सारा, अनन्या, रिद्धीमा की सोनम..? शुभमन गिलच्या मनात नेमकं कोण? आता स्वतःच दिल 'हे' उत्तर
भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज शुभमन गिल नेहमीच चर्चेत असतो. शांत स्वभावाच्या शुभमनमध्ये अनेकांना राहुल द्रविड दिसतो. आपल्या प्रतिभावान खेळाच्या जोरावर शुभमनने अनेक विक्रम केले आहेत. याच शुभमनचे अनेकदा वेगवेगळ्या मुलींसोबत नावही जोडले जाते. परंतु आत्तापर्यंत शुभमनने याबाबत कोणताही खुलासा केला नव्हता. मात्र आता त्याने या विषयावर मौन सोडले आहे.

शुभमनचे कुणाशी जोडले नाव?
शुभमन गिल हा टीम इंडियातील सर्वात लोकप्रिय बॅचलर आहे. गिलने मैदानाबाहेरही लोकांचे अनेकदा लक्ष वेधून घेतले आहे. त्याचे नाव एका बॉलिवूड अभिनेत्री आणि एका प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या मुलीशी देखील जोडले गेले होते. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर व्यतिरिक्त शुभमन गिलचे नाव अनन्या पांडे, रिद्धिमा पंडित, सोनम बाजवा आणि अवनीत कौरसोबत जोडले गेले आहे.
काय म्हणाला शुभमन गिल?
अनेकदा अनेक जणींशी नाव जोडले गेल्यानंतरही शुभमन गिल यावर शांत होता. मात्र आता गिलने एका मुलाखतीत त्याच्या मनातली खंत बोलून दाखवली. अशा बातम्यांमुळे तो किती अस्वस्थ आहे, हे त्याने स्पष्टपणे सांगितले. शुभमन गिल म्हणाला की, 'मी गेल्या तीन वर्षांपासून सिंगल आहे. माझ्याबद्दल अनेक अटकळ आणि अफवा पसरवल्या जात आहेत. माझे नाव वेगवेगळ्या लोकांशी जोडले गेले. कधीकधी ते इतके मजेदार असते की मी ज्या व्यक्तीला आयुष्यात मी समोरासमोर पाहिलेही नाही, तिच्यासोबत माझे नाव जोडले जाते. सध्या माझे संपूर्ण लक्ष माझ्या खेळावर केंद्रीत आहे, असे म्हणत गिलने या सर्व अफवांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
माझ्याकडे वेळच नाही
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स सध्या आयपीएल- २०२५ मध्ये चमकदार कामगिरी करत आहे. गुजरात टायटन्स सध्या आयपीएलच्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. गिलच्या शांत आणि संयमी कर्णधारपदाचे खूप कौतुक केले जात आहे. अफवांबाबत तो पुढे म्हणाला की, मी सध्या फक्त खेळाकडे लक्ष देत आहे. मी बॅचलरच आहे. वर्षातील ३०० दिवस माझे खेळण्यात जातात. त्यामुळे कुणाला वेळ देण्यासाठी व कुणाबरोबर फिरण्यासाठी माझ्याकडे पुरेसा वेळ नाही.
साराने केले अनफाँलो
शुभमन गिलचे नाव सारा तेंडुलकरशी जोडले गेले होते. आता या दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ असा की, आता त्यांच्यात काहीही नाही. अलीकडेच गिलबद्दल बातम्या आल्या की तो अवनीत कौरला डेट करत आहे. दोघेही त्यांच्या मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसले. अवनीतनेही गिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याशिवाय, ती अनेक वेळा टीम इंडियाला पाठिंबा देताना दिसली.
-
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
Chaitra Amavasya 2026 :18 की 19 मार्च? चैत्र अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, शुभ-मुहूर्त, महत्व -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
PF चे पैसे आता 3 दिवसांतच मिळणार! नोकरी बदलली तरी 'ऑटोमॅटिक ट्रान्सफर' होणार; नवे नियम वाचा -
Gudi Padwa 2026: गुढीपाडवा कधी आहे? का साजरा केला जातो हा सण? जाणून घ्या यामागील रंजक पौराणिक कथा -
LPG e-KYC Update : सर्व गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी गरजेची आहे का? पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा खुलासा







Click it and Unblock the Notifications