Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

श्रेयस अय्यरला आयसीसीकडून मोठं बक्षीस, आता आयपीएलमध्ये पाडतोय धावांचा पाऊस

ICC Mens Player of the Month, Shreyas Iyer: टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू श्रेयस अय्यरला आयसीसीकडून मोठं बक्षीस मिळालं आहे. टीम इंडियाच्या मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने मार्च 2025 साठी आयसीसी पुरुष प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे. त्याने न्यूझीलंडच्या जेकब डफी आणि रचिन रवींद्र यांना मागे टाकून ही मोठी कामगिरी केली आहे. गेल्या काही काळापासून श्रेयस अय्यर सातत्याने फलंदाजीने धावा करत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर तो आयपीएलमध्येही धावांचा पाऊस पाडत आहे.

श्रेयस अय्यरने दाखवली त्याची ताकद

2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरने भारताकडून सर्वाधिक 243 धावा केल्या होत्या. दुबई आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारताच्या यशात श्रेयस अय्यरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अय्यरच्या आधी शुभमन गिलने फेब्रुवारीमध्ये हा सन्मान जिंकला होता. अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मधल्या फळीतील फलंदाज म्हणून टीम इंडियासाठी अनेक सामना जिंकणाऱ्या खेळी केल्या आहेत.

Shreyas Iyer

प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकल्याबद्दल अय्यर सर्वांचे आभार मानले आहेत, श्रेयस अय्यरने म्हटलं आहे की "मार्च महिन्यातील मेन्स प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड झाल्याबद्दल मी खरोखरच सन्मानित आहे. हा सन्मान अविश्वसनीयपणे खास आहे, विशेषतः ज्या महिन्यात आपण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, तो क्षण मी कायमचा जपून ठेवेन. इतक्या मोठ्या व्यासपीठावर भारताच्या यशात योगदान देणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. माझ्या संघातील सहकारी, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ यांनी दिलेल्या अढळ पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे".

चॅम्पियन्स ट्रॉफीत श्रेयस अय्यरची महत्वाची कामगिरी

मार्च महिन्यात अय्यरने तीन सामन्यांमध्ये 57.33 च्या सरासरीने आणि 77.47 च्या स्ट्राईक रेटने 172 धावा केल्या आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान श्रेयस अय्यरने ग्रुप अ सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध 79 धावा तर सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 45 धावा आणि फायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध 48 धावाची महत्वाची खेळी करत टीम इंडियाला विजेता बनवलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+