Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

श्रेयस अय्यर बनला 'वनडे'चा कर्णधार! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम जाहीर, BCCI ची घोषणा

Shreyas Iyer Named India 'A' Captain for Australia Series : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने आगामी ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी श्रेयस अय्यरला 'भारत अ' संघाचा कर्णधार म्हणून घोषित केले आहे. दोन दिवसांपूर्वीच पाठीच्या दुखण्यामुळे 'रेड-बॉल' क्रिकेटमधून सहा महिन्यांसाठी ब्रेक घेतलेल्या श्रेयस अय्यरसाठी ही मोठी संधी आहे.

Shreyas Iyer Named India  A  Captain

कधी सुरु होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका?

ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्ध तीन सामन्यांची ही मालिका ३० सप्टेंबरपासून कानपूरमध्ये सुरू होणार आहे. या मालिकेसोबतच इराणी कपसाठी 'रेस्ट ऑफ इंडिया' संघाचीही घोषणा करण्यात आली आहे, ज्याचा सामना १ ऑक्टोबर रोजी नागपूरमध्ये रणजी विजेत्या संघासोबत होणार आहे.

मालिकेसाठी 'भारत अ' संघात कोण-कोण?

पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी आणि अंतिम दोन सामन्यांसाठी असे दोन वेगवेगळे संघ घोषित करण्यात आले आहेत. तर या पुर्ण मालिकेसाठी श्रेयस अय्यर संघाचा कर्णधार असेल. विकेट किपरची भुमिका प्रभासिमरन सिंग पार पाडणार असून आयपीएलमध्ये चमकलेले सितारे यामध्ये रियान पराग, आयुष बडोनी, रवी बिश्नोई, प्रियांश आर्य, गुर्जपनीत सिंग यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या दोन सामन्यांसाठी उपकर्णधार म्हणून तिलक वर्माचा समावेश करण्यात आला आहे. याच सामन्यांसाठी अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांचाही भारतीय अ संघात समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी संघ:

  • श्रेयस अय्यर (कर्णधार)
  • प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)
  • रियान पराग
  • आयुष बडोनी
  • सूर्यांश शेडगे
  • विप्राज निगम
  • निशांत सिंधू
  • गुर्जपनीत सिंग
  • युधवीर सिंग
  • रवी बिश्नोई
  • अभिषेक पोरेल (विकेटकीपर)
  • प्रियांश आर्य
  • सिमरजीत सिंग

अंतिम दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघ:

या संघात पहिल्या सामन्यातील खेळाडूंसोबतच काही नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा हे दोन्ही खेळाडू सध्या वरिष्ठ भारतीय संघासोबत आशिया कपमध्ये सहभागी आहेत.

  • श्रेयस अय्यर (कर्णधार)
  • तिलक वर्मा (उप-कर्णधार)
  • अभिषेक शर्मा
  • प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)
  • रियान पराग
  • आयुष बडोनी
  • सूर्यांश शेडगे
  • विप्राज निगम
  • निशांत सिंधू
  • गुर्जपनीत सिंग
  • युधवीर सिंग
  • रवी बिश्नोई
  • अभिषेक पोरेल (विकेटकीपर)
  • हर्षित राणा
  • अर्शदीप सिंग

उर्वरित भारत संघ (इराणी कप):

रजत पाटीदार (कर्णधार), अभिमन्यू ईश्वरन, आर्यन जुयाल (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (विकेटकीपर), यश धुल, शेख रशीद, इशान किशन (विकेटकीपर), तनुश कोटियन, मानव सुथार, गुरनूर ब्रार, खलील अहमद, आकाश दीप, अंशुल कंबोज, सरांश जैन

श्रेयस अय्यरचा रेड-बॉल क्रिकेटला रामराम

बीसीसीआयला दिलेल्या माहितीत श्रेयस अय्यरने सांगितले आहे की, पाठीच्या दुखण्यामुळे तो पुढील ६ महिने रेड-बॉल क्रिकेट खेळणार नाही. यूकेमध्ये पाठीची शस्त्रक्रिया केल्यानंतर तो बरा झाला होता, पण अलीकडेच लांब फॉरमॅटचे सामने खेळताना त्याला पुन्हा पाठीत आखडणे आणि वेदना जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे, आपल्या आरोग्याला प्राधान्य देत त्याने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+