नेमबाजपटू मनू भाकरवर कोसळला दुःखाचा डोंगर; भीषण अपघातात मामा व आजीचा मृत्यू
नुकताच खेलरत्न पुरस्कार मिळालेली नेमबाजपटू मनु भाकरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे सख्खे मामा व आजी एका रस्ता अपघातात मरण पावले आहेत. महेंद्रगड बायपास रस्त्यावर हा अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या कारने हे दोघे जात असलेल्या स्कुटरला जोराची धडक दिली. अपघात एवढा भयंकर होता की मनु भाकरचे मामा व आजीच्या जागीच मृत्यू झाला.

कसा झाला अपघात?
युद्धवीर सिंग (वय ५०) असे मनु भाकरच्या मामाचे नाव आहे. तर तिच्या आजीचे नाव सावित्री देवी (वय ७०) आहे. मामा युद्धवीर सिंग हे महेंद्रगड बायपास येथे राहतात. तेथून ते सावित्रीदेवी यांना घेऊन धाकट्या भावाच्या घरी लोहारु चौकाकडे जात होते. कालियाना वळणाजवळ मागून आलेल्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. आज सकाळी हा अपघात झाला. कारचा वेग एवढा जास्त होता की, धडक झाल्यावरही कारचालकाला गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही. अखेर तो अपघातस्थळावरुन त्याच वेगाने पसार झाला.
Charkhi Dadri, Haryana: In a tragic incident on Mahendragarh Bypass Road, international shooter Manu Bhaker’s grandmother and uncle lost their lives when their scooter collided with a Brezza car. The car driver fled the scene. Police have taken the bodies for post-mortem and are… pic.twitter.com/x5HRzPTlSx
— IANS (@ians_india) January 19, 2025
आजीलाही खेळायचे होते ऑलंपिक
काही मिडिया रिपोर्टनुसार मनु भाकरसारखीच तिची आजीही नेमबाजीत तरबेज होती. त्यांनी राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके जिंकली होती. आजी सावित्रीदेवी यांनाही ऑलंपिक खेळण्याची इच्छा होती. मात्र त्यावेळी घरातून पाठींबा न मिळाल्यामुळे त्यांचे ऑलंपिक खेळण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.












Click it and Unblock the Notifications