'गब्बर' पुन्हा चढला बोहल्यावर! शिखर धवनचा सोफी शाइनसोबत शाही विवाह; 'तो' रोमँटिक व्हिडिओ व्हायरल
Shikhar Dhawan second marriage Video : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज माजी सलामीवीर, ज्याला चाहते प्रेमाने 'गब्बर' म्हणतात, तो शिखर धवन पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकला आहे. आपल्या आयुष्याच्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावाची सुरुवात करत धवनने त्याची दीर्घकाळाची मैत्रीण सोफी शाइन हिच्यासोबत संसार थाटला आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वरमालेनंतर स्टेजवरच व्यक्त केलं प्रेम
सोशल मीडियावर सध्या या लग्नातील काही 'अनसीन' व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहेत. विशेषतः वरमाला सोहळ्याचा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये, सोफीने गळ्यात हार घालताच धवनचा आनंद गगनात मावेनासा झाला. विधी पूर्ण होताच या नवदांपत्याने स्टेजवरच एकमेकांना मिठी मारत आपले प्रेम व्यक्त केले. या दोघांमधील केमिस्ट्री आणि 'लिपलॉक'चा क्षण पाहून चाहत्यांनी या जोडीला सोशल मीडियावर पसंती दर्शवली आहे.
Mr. & Mrs. Dhawan ❤️ pic.twitter.com/paUVWSmwGf
— Shikhar Dhawan (@SDhawan25) February 22, 2026
दुबईत सुरू झालेली प्रेमसंहाणी
धवन आणि सोफी यांच्या प्रेमाची चर्चा गेल्या दीड वर्षांपासून सुरू होती. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान दुबईत हे दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले होते. त्यानंतर, मे २०२५ दोघांनी आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली. १२ जानेवारी २०२६: सोशल मीडियावर साखरपुड्याची घोषणा केली. २० फेब्रुवारी २०२६: हळदीचा थाट पार पडला आणि त्यानंतर हा शाही विवाह सोहळा संपन्न झाला.
'गब्बर'चा दुसरा डाव
शिखर धवनचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी २०११ मध्ये त्याने आयशा मुखर्जीसोबत लग्न केले होते, मात्र ११ वर्षांनंतर २०२३ मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला. त्यांना 'जोरावर' नावाचा मुलगा असून तो सध्या आयशासोबत राहतो. जुन्या जखमा विसरून धवन आता सोफीसोबत नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवत आहे.












Click it and Unblock the Notifications