संन्यासानंतर दुस-या दिवशी शिखर धवनबाबत अपडेट समोर, पुन्हा घुमणार 'गब्बर' ची बॅट, चाहते झाले खुश
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून रिटायरमेंटची घोषणा केली आहे. धवनने ही घोषणा केल्यानंतर लगेचच लेजेंड्स लीग क्रिकेटमध्ये प्रवेश केला आहे. स्फोटक फलंदाजी आणि जिंदादिली व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या धवनच्या कारकिर्दीतील या हालचालीमुळे एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.
धवनने व्यक्त केला आनंद
शिखर धवनने एलएलसीमध्ये सामील होण्याबद्दलचा उत्साह शेअर करताना म्हटले आहे की, "लिजेंड्स लीग क्रिकेटसोबत हा नवीन अध्याय सुरू करणे हा माझ्या रिटायरमेंटनंतरचा सर्वोत्तम निर्णय वाटतो. माझे शरीर अजूनही खेळण्यासाठी तयार आहे आणि मी माझ्या निर्णयावर अगदी निवांत आहे. क्रिकेट हा माझ्या आयुष्याचा मोठा भाग आहे. हे माझ्यापासून कधीही दूर जाणार नाही.

असे आहे शिखर धवनचे करिअर
धवनने पुढे लिहिले की, मी माझ्या क्रिकेटमधील मित्रांसोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी आणि चाहत्यांचे मनोरंजन करत राहण्यासाठी उत्सुक आहे कारण आम्ही एकत्र येऊन नवीन आठवणी निर्माण करतो. शिखर धवनने आपल्या कारकिर्दीत अनेकदा मोठे यश संपादन केले आहे. 2013 आसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शिखर धवनची प्लेअर आॅफ टूर्नामेंट म्हणून निवड करण्यातआली होती. आणि त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 44.1 च्या सरासरीने 6,793 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 91.35 आणि सरासरी 27.92 आहे.
लिजेंड्स लीग क्रिकेटचे सह-संस्थापक काय म्हणाले?
लीजंड्स लीग क्रिकेटचे सह-संस्थापक रमन रहेजा यांनी धवन लीगमध्ये सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. रहेजा म्हणाले की, शिखर धवन आमच्यासोबत आल्याने आम्हाला आनंद झाला आहे. त्याचा अनुभव आणि प्रतिभा चाहत्यांचे मनोरंजन करेल. इतर क्रिकेट दिग्गजांसह त्याला खेळताना पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. त्यामुळे अनुभवी क्रिकेटपटूंसाठी दुसऱ्या डावातील पर्याय म्हणून आमचे स्थान आणखी मजबूत होईल.
लीग क्रिकेट कधी सुरू होणार?
लिजेंड्स लीग क्रिकेटचा हंगाम सप्टेंबर 2024 मध्ये सुरू होणार आहे, ज्यामध्ये अनेक निवृत्त क्रिकेटपटू रोमांचक सामन्यांच्या मालिकेत भाग घेतील. या स्पर्धेत धवनचा सहभाग चाहत्यांचे लक्ष वेधून घेईल अशी अपेक्षा आहे, कारण मैदानावर त्याचे कौशल्य पुन्हा पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.












Click it and Unblock the Notifications