Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs NZ: सर्फराज खानने झळकावलं पहिलं कसोटी शतक, न्यूझीलंडविरुद्ध भारताचे शानदार पुनरागमन

IND vs NZ: टीम इंडियाचा युवा खेळाडू सर्फराज खानने भारत विरुध्द न्यूझीलंड पहिल्या कसोटी सामन्यात आपलं दमदार शतक झळकावलं आहे. चौकार मारून त्याने आपले शतक पूर्ण केले आहे. शतक झळकावल्यानंतर सर्फराझने बॅट उंचावत मैदानात जोरदार सेलिब्रेशन केलं.

बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सरफराज खानने 13 चौकार आणि तीन षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. पहिले कसोटी शतक झळकावण्यासाठी त्याला सात डाव लागले. त्याने 110 चेंडूत 13 चौकार आणि तीन षटकार ठोकले.

Sarfaraz Khan

दडपणाखाली दमदार शतक झळकावत सर्फराज खाने टीम इंडीयामध्ये आपली जागा आती पक्की केली आहे. सरफराजला शुभम गिलच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. शुभम गिल मागील काही दिवसांपासून मानेच्या दुखण्याने त्रस्त असलेमुळे सर्फराजला त्यांच्या जागी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. 26 वर्षीय सरफराजने या वर्षी राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

सर्फराज खानने इराणी कपमध्ये दमदार द्विशतक झळकावत आपला खेळ दाखवला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला होता. पण दुसऱ्या डावात त्याने शानदार पुनरागमन करत तिसऱ्या विकेटसाठी विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी केली. सरफराजने या महिन्याच्या सुरुवातीलाच बाकीच्या भारताविरुद्ध इराणी कपमध्ये मुंबईसाठी द्विशतक झळकावले आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 15 शतके झळकावली आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+