शेतकऱ्याच्या मुलानं ऑलिम्पिकमध्ये फडकावला तिरंगा, कास्यपदक मिळताच सरबज्योत सिंगचे वडिल भाऊक
Paris Olympics 2024, Sarabjot Singh News: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एका शेतकऱ्याच्या मुलाने मिश्र नेमबाजी प्रकारात कास्यपदक मिळवत देशाचं हृदय जिंकलं. पॅरिसमध्ये मोठ्या शानदार पद्धतीनं त्यानं तिरंगा ध्वज फडकावत समस्त भारतीयांची मान उंचावली आहे. सरबज्योत सिंग असं या शुटरचं नाव आहे.
भारतीय नेमबाजी संघाने पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय ठरून मनू भाकरने इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर मिश्र सांघिक स्पर्धेत त्याने सरबजीत सिंगसोबत कांस्यपदक जिंकले.

सरबज्योत सिंगचे पहिले ऑलिम्पिक पदक
भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे. ही कामगिरी भारताचे पॅरिस ऑलिम्पिकमधील दुसरे पदक आहे. मनू भाकर आता ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. तर तिचा साथीदार सरबज्योत सिंगचे हे पहिले ऑलिम्पिक पदक आहे.
काय म्हणाले सरबज्योत सिंगचे वडिल?
सरबज्योत सिंगचे वडील जितेंद्र सिंह यांनी आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, मनू भाकर आणि माझ्या मुलाने कांस्यपदक जिंकले आहे. मनु भाकर आणि त्यांच्या परिवाराचे हार्दिक अभिनंदन. आम्ही खूप आनंदी आहोत, सर्वप्रथम मी गुरुद्वारात जाऊन नमस्कार करेन. हा विजय आमच्या गावात साजरा होईल.
#WATCH | Ambala, Haryana: At #ParisOlympics2024, shooters Manu Bhaker and Sarabjot Singh bring India its second medal as they win Bronze in 10m Air Pistol Mixed team event.
— ANI (@ANI) July 30, 2024
Sarabjot Singh's father, Jitender Singh says, "...Manu Bhaker and my son have won Bronze. Heartiest… pic.twitter.com/kQgKLbS1GS
वडिलांनी त्याला नेहमीच साथ
लहान गावातून येऊनही सरबजोतच्या पालकांनी त्याला चांगले प्रशिक्षण दिले आहे. सरबजोतचे वडील शेतकरी आहेत, पण त्यांनी सरबजोतला प्रशिक्षक अभिषेक राणा यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाला कँटमधील एआर शूटिंग ॲकॅडमीमध्ये व्यावसायिक प्रशिक्षणासाठी दिल्लीला पाठवले. सरबज्योतने नेमबाजी स्पर्धांमध्ये सातत्याने आपले कौशल्य दाखवले आहे.
अशी आहे कामगिरी
- 2019 मध्ये ISSF कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत दोन रौप्य आणि एक सुवर्णपदक जिंकून त्याने प्रथम आंतरराष्ट्रीय ओळख मिळवली. तर मनू भाकरने दुसरे पदक जिंकून भारताचा तिरंगा फडकवला आहे.
- सरबजोतकडून आगामी काळात अनेक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहेत 2023 मध्ये भोपाळ आणि बाकू येथे आयोजित विश्वचषकातही त्याची विजयी मालिका सुरू होती.
- 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली होती. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीवरून त्याचे 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारातील प्रभुत्व दिसून येते. त्याचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता, सरबज्योत सिंगमध्ये भविष्यातील स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याची अफाट क्षमता आहे.












Click it and Unblock the Notifications