Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Anaya Bangar : माजी क्रिकेटपटू संजय बांगरची मुलगी अनया बांगरचा गौफ्यस्फोट, म्हणाली- मला नग्न फोटो..

Anaya Bangar Shocking Allegations: टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांच्या मुलाचं नाव आर्यन बांगर असे होते. तो गेल्या वर्षीपर्यंत मुलगा होता. पण, हार्मोन समस्येमुळे त्यानं त्याचं लिंग बदल शस्त्रक्रिया केली अन् आर्यनचा अनया झाला.

लिंग बदलल्यानंतर तो भारतामध्ये आला आहे. त्यानंतर त्यानं मुलगा ते मुलीपर्यंत झालेल्या प्रवासाबद्दल त्याचा अनुभव शेअर केला. त्याचबरोबर या प्रवासात झालेल्या त्रासाविषयी तसेच त्याच्यासोबत आलेल्या वाईट अनुभवाबाबत देखील गौप्यस्फोट केला आहे.

'लल्लन टॉप' या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनाया बांगरनं अनेक गोष्टींचा खुलासा केला. तर माजी खेळाडूंवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले.

अनया म्हणाली की, काही 'क्रिकेटर मला त्यांचे घाणेरडे, नग्नावस्थेतील फोटो पाठवायचे. काही तर मला कारमध्ये बसायला सांगत. त्यांना माझ्याबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित करायचे होते. काही क्रिकेटर तर मला सर्वांसमोर शिवीगाळ करत आणि फोटो देखील मागत असे, असे गंभीर आरोप अनयाने केले.

Anaya Bangar

अनया सद्या कशी काम करतेय?

अनाया सध्या युनायटेड किंग्डममध्ये राहते. त्यांनी क्रिकेटच्या जगात 'विषारी पुरुषत्व' बद्दलही सांगितले. अनायाने सांगितले की, "तिला तिचे खरे लिंग कसे कळले आणि तिला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले.

महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंना सहभागी होण्यापासून रोखण्याच्या आयसीसीच्या निर्णयाबद्दल देखील तीने नाराजी व्यक्त केली. मला हे आठ-नऊ वर्षांची असताना कळलं होतं. मी माझ्या आईच्या कपाटातून कपडे काढायचे आणि ते घालायचे. मग मी आरशात बघून म्हणायची, मी एक मुलगी आहे. मला एक मुलगीच राहायचं होतं.

अनेक क्रिकेटपटूंसोबत खेळली

अनायाने सांगितले की, ती मुशीर खान, सरफराज खान आणि यशस्वी जैस्वाल यांसारख्या प्रसिद्ध क्रिकेटपटूंसोबत खेळली आहे. माझे वडील एक सेलिब्रिटी असल्याने मला स्वतःबद्दल सर्व काही गोष्टी लपवाव्या लागत होत्या.

क्रिकेटचे जग असुरक्षितता आणि विषारी पुरुषत्वाने भरलेले आहे. लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर सहकारी क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रियेबद्दल देखील तिने बिनधास्तपणे मत व्यक्त केली. अनायाने सांगितले की, "मला पाठिंबा मिळाला आहे तर काही ठिकाणी त्रास देखील सहन करावा लागला.

त्या क्रिकेटपटूने नग्न फोटो पाठवले

अनया म्हणाली, काही क्रिकेटपटूंनी मला न विचारता त्यांचे नग्न फोटो पाठवले. तो माणूस सर्वांसमोर शिवीगाळ करायचा. मग तोच माणूस माझ्या शेजारी येऊन बसायचा आणि माझे फोटो मागायचा.

आणखी एक घटना घडली. मी भारतात असताना, मी एका जुन्या क्रिकेटपटूला माझ्या परिस्थितीबद्दल सांगितले. तो मला म्हणाला, चल गाडीत जाऊया, मला तुझ्यासोबत संबंध प्रस्थापित करायचे आहे. असा वाईट अनुभव देखील अनयाने सांगितला. पण तो क्रिकेटपटू कोण आहे, याची माहिती मात्र तीने जाहीर केली नाही.

लिंगबदलावर वडीलांची प्रतिक्रिया काय होती?

अनयानं यावेळी त्याचे वडील संजय बांगरबद्दलही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. मी लिंग बदलल्यानंतर क्रिकेट खेळणं थांबवलं पाहिजे. तुला आता क्रिकेटमध्ये जागा नाही' असं त्यांनी मला सांगितलं होत, असे देखील त्यांनी स्पष्ट सांगितले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+