सानिया मिर्झाचा पुर्वीचा पती शोएब मलिकची नोकरी गेली! काढण्याआधी दिला राजीनामा, किती होता त्याचा पगार
Sania mirzas ex husband shoaib malik lost his job : शोएब मलिक एकेकाळचा पाकिस्तानी क्रिकेट संघाचा आधारस्तंभ आणि अष्टपैलू खेळाडू..त्याने भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा हिच्याशी लग्न केले. त्यानंतर त्यांचा संसारही चालला पण नंतर दोघांनी काडीमोड घेतला. तेव्हापर्यंत त्याची चर्चा होती, पण आता त्याच्यावर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.
नोकरी गमावण्याची वेळ आल्याने आता पुन्हा शोएब मलिक चर्चेत आला आहे. त्याच्यासोबत आणखी काही त्याचे सहकारी आहेत, ज्यांना नोकरी गमवावी लागत आहे. वृत्त तर असे आहे की, शोएब आणि त्याच्या सहकाऱ्यांना काढून टाकण्यात येणार होते पण त्यांनी अपमान होऊ नये म्हणून आधीच राजीनामा दिला आहे.

सानियाशी घटस्फोटानंतर शोएबचे तिसरे लग्न
सानिया मिर्झाचा माजी पती शोएब मलिक पाकिस्तानमध्ये राहतो. सानियाशी घटस्फोटानंतर तो तिसऱ्यांदा बाहुल्यावर थाटला आहे. त्याची तिसरी पत्नी सना जावेदसोबत तो राहतो. आता त्याला त्याची नोकरी गमवावी लागली आहे, ही पाकिस्तान क्रिकेटमधील एक मोठी घडामोड आहे.
काय होती शोएबवर जबाबदारी
वनइंडिया हिंदीनुसार, पाकचा माजी क्रिकटर शोएब मलिकवर देशांतर्गत क्रिकेटची रचना सुधारण्यासाठी शोएब मलिकला मार्गदर्शक बनवण्यात आले. काही माजी क्रिकेटपटूंना डॉल्फिन्स, लायन्स, पँथर्स स्टॅलियन्स, मारमोर्ख संघांसाठी मार्गदर्शक बनवण्यात आले. या सर्वांना नवीन खेळाडूंना घडवण्याचे काम देण्यात आले होते.
या खेळाडूंना पीसीबीने केले होते मार्गदर्शक म्हणून नियुक्त
शोएब मलिकशिवाय मिसबाह, वकार युनूस, सरफराज अहमद आणि सकलेन मुश्ताक यांच्यावरही ही मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती पण देशांतर्गत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मार्गदर्शक नियुक्त करण्याची योजना अपयशी ठरल्यानंतर त्यांना नोकरी गमवावी लागली.
काढून टाकण्याआधीच राजीनामा!
पीसीबी या सर्वांना काढून टाकणार होते ही कुणकुण लागल्यानंतर अशा परिस्थितीत अपमान होण्याच्या भीतीने मलिकने राजीनामा दिला आहे.
शोएब मलिकचा पगार किती होता?
मार्गदर्शक म्हणून नवीन खेळाडू घडवण्याच्या कामासाठी शोएब मलिकचा पगार 50 लाख रुपये निश्चित करण्यात आला होता, खर तर वृत्त असेही आहे की, एवढी मोठी रक्कम वेतन म्हणून देण्याला विरोधही झालेला आहे, पण त्यावेळी पीसीबीने लक्ष दिले नाही पण आता कारवाई करण्यात आली आहे.
अशी केली मलिकने युक्ती!
पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी हे या पाच जणांना काढून टाकण्याच्या मनःस्थितीत होते आणि तेथील माध्यमांमध्ये बातम्या सुरू होत्या. परिस्थिती लक्षात येताच, मलिक यांनी शांतपणे पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि आपला निर्णय जाहीर केला. मलिकने पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना एक लांब पत्र लिहून त्यांच्या निर्णयाची माहिती दिली.












Click it and Unblock the Notifications