मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची संपत्ती किती, निवृत्तीनंतर दर महिन्याला किती कमावतो, वाचा सविस्तर
Sachin Tendulkar wealth : क्रिकेटचा देव अशी उपमा ज्या खेळाडूला भारतीयांनी दिली त्या मास्टर ब्लास्टर तथा भारतरत्न सचिन तेंडुलकरने क्रिकेटला बाय बाय करुन जवळपास 11 वर्षे झाले आहेत. तरीही दर महिन्याला सचिन तेंडुलकर करोडो रुपये कमावतो आहे. नेमकी सचिन तेंडुलकरची संपत्ती किती आहे, निवृत्तीनंतर उत्पन्नाचा त्याचा स्त्रोत कोणता आहे, यावर आपण नजर टाकूया.
भारतासाठी 24 वर्षे योगदान
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट संघासाठी जवळपास 24 वर्षे योगदान दिलेले आहे. 2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सचिनने अलविदा केला. त्याने वनडे आणि टेस्ट सामन्यांमध्ये असे विक्रम केले जे अजून कोणालाही मोडता आलेले नाही. त्याच्या योगदानामुळे सरकारने भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे.

सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देवही म्हटले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत एकूण 100 शतके झळकावली आहेत. सचिन तेंडुलकर आज खेळत नसला तरी निवृत्तीच्यानंतर ही तो करोडो रुपये वर्षाला कमवतो. वयाची पन्नाशी ओलांडलेला सचिन कुठून कमावतो आणि आता त्याची नेट वर्थ किती आहे, याची उत्सुकता सर्वांनाच असते.
सचिनची एकूण संपत्ती किती?
सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक रन करण्याचा रेकॉर्ड आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 15,921 धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 18,426 धावा आहेत. रनांचा बादशहा असलेल्या सचिन तेंडुलकरांची एकूण संपत्ती ही 1,410 कोटी रुपये आहे.

उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत काय?
काही माध्यमांच्या अहवालानुसार, भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आता जाहिराती आहेत. क्रिकेटमधून निवृत्तीच्या इतक्या दिवसांनंतरही सचिन तेंडुलकरचे मासिक उत्पन्न 4 कोटींहून अधिक आहे, तर वार्षिक उत्पन्न 55 कोटींहून अधिक आहे. सचिन तेंडुलकर ITC Savlon, Jio Cinema, Spinny, Apollo Tyres आणि Ageas Federal Life Insurance सारख्या कंपन्यांच्या जाहीराती केल्या आहेत. तर दर महिन्याला त्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

कोहली, धोनीलाही टाकतो मागे
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन तेंडुलकरचे मुंबईतील अत्यंत पॉश भागात वांद्रे येथे अलिशान घर आहे. त्याच्या बंगल्याची किंमत सुमारे शंभर कोटी असल्याचे सांगितले जात आहे. 2007 मध्ये त्याने बांद्रा कुर्ला येथे 40 कोटी रुपयांचा एक आलिशान फ्लॅटही खरेदी केला होता. सचिनचा मुंबईशिवाय केरळमध्ये देखील आलिशान बंगला असून इंग्लंडमध्येही त्याचे घर आहे.

अनेक महागड्या गाड्या
सचिनचे मुंबई आणि बंगळुरू येथे दोन रेस्टॉरंट देखील आहेत. या गुंतवणुकीतून तो 10 कोटी रुपये कमावतो. सचिनची एकूण संपत्ती विराट कोहली (1018 कोटी) आणि महेंद्रसिंग धोनी (1060 कोटी) पेक्षा जास्त आहे. सचिनकडे अनेक महागड्या गाड्या देखील आहेत. सचिनकडे निसान GT R, BMW i8, BMW M5, Mercedes Benz, BMW X5M, BMW M6 सारख्या नवीन मॉडेलच्या गाड्या आहेत.












Click it and Unblock the Notifications