Video : सचिन तेंडुलकरची धुळवड; सचिनने युवराज, युसूफला असे काही भिजवले, की पळायला चान्सच नाही मिळाला
इंटरनॅशनल मास्टर्स लीग २०२५ च्या स्पर्धेत सध्या सचीन तेंडूलकर विस्फोटक फलंदाजी करताना दिसत आहे. काल झालेल्या सेमिफायनलमध्ये इंडिया मास्टर्सने ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा ९४ धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यांत सचिनने ३० चेंडूत ४२ धावा ठोकल्या तर युवराज सिंगने ३० चेंडूत ५९ धावा चोपल्या. आज या खेळाडूंनी धुळवड साजरी करत रंगही उधळले. सचिन तेंडूलकरने युवराज, युसूफ पठाण यांना न सांगता भिजवल्याचा व्हिडीओ त्याच्या अकाऊंटला शेअर केला. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडीओत?
सचिन तेंडूलकरने आज त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटला धुळवडीचा एक व्हिडीओ अपलोड केला. या व्हिडीओत सचिन तेंडूलकरच्या हातात रंगाने भरलेली पिचकारी आहे. तो म्हणतोय की, आपण आज काल बरेच षटकार ठोकलेल्या युवराज सिंगला भिजवूया. त्यानंतर सचिन व त्याचे सहकारी युवराज झोपलेल्या खोलीसमोर जातात. तेथे एक सहकारी युवराजला हाऊसकिपींग अशी हाक मारुन दरवाजा ठोठावतो. युवराज बेसावधपणे दरवाजा उघडतो. त्यानंतर सचिनसह सगळेच त्याच्यावर रंग टाकतात. हे सगळं बेसावधपणे होत असल्याने युवराज चांगलाच गोंधळून जातो. मात्र त्याला पळायला हे इतर खेळाडू जागाच ठेवत नाही.
Holi fun with my @imlt20official teammates, from blue jerseys to colourful moments, this is how we say, “Happy Holi!” 💙 pic.twitter.com/uhYBZvptVT
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 14, 2025
युसूफ, अंबातीही शिकार
त्यानंतर सचिन व त्याचे इतर सहकारी युसूफ पठाणलाही याच पद्धतीने रंगवतात. त्यानंतर अंबाती रायडूच्या रुममध्येही सेम ड्रामा केला जातो. अंबाती रायडू बाहेर आल्याबरोबर त्याच्यावर रंग टाकला जातो. तोही बेसावध असतो. मात्र त्याला पळायला हे चान्सच देत नाहीत. सचिन तेंडूलकरने धुळवडीचा पोस्ट केलेला हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याच्या फॅन्सकडून या व्हिडीओखाली हॅप्पी होळी अशा कमेंट यायला लागल्या आहेत.
इंडिया मास्टर्स फायनलमध्ये
इंडिया मास्टर्सने पहिल्या सेमिफायनलध्ये ऑस्ट्रेलिया मास्टर्सचा ९४ धावांनी पराभव करत इंटरनॅशनल मास्टर्स लीग -२०२५ च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. हा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये झाला. या सामन्याची नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. त्यानी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र इंडियन्स मास्टर्सने या सामन्यांत २० षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात २२० धावांचा डोंगर उभा केला. त्यात सचिनने ४२ तर युवराजने ५९ धावा चोपल्या होत्या.












Click it and Unblock the Notifications