South Africa vs New Zealand: दोन्ही संघासाठी करो या मरो अशी परिस्थिती, जाणून घ्या हेड-टू-हेड रिकॉर्ड

South Africa vs New Zealand: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आज बुधवारी (ता. 5 मार्च) रोजी दक्षिण आफ्रिका विरुध्द न्यूझीलंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळला जाईल. हा महत्त्वाचा सामना आज लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर होणार आहे. या दोन्ही संघापैकी जो संघ विजयी होईल तो 9 मार्च रोजी दुबई येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताशी भिडणार आहे.

स्पर्धेत अपराजित राहिलेला दक्षिण आफ्रिका गट ब मध्ये अव्वल स्थानावर आहे तर न्यूझीलंडला भारताकडून झालेल्या पराभवातून सावरावे लागेल. उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात जोरदार स्पर्धा होईल.

South Africa vs New Zealand

South Africa vs New Zealand: हेड-टू-हेड रिकॉर्ड

न्यूझीलंड विरुध्द दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 73 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. आतापर्यंतच्या एकदिवसीय सामन्याच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेची वरचढ कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडला 42 वेळा पराभूत केलं आहे तर किवी संघाला फक्त 26 सामने जिंकता आले आहेत. 5 सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. अशा परिस्थितीत,सेमीफायनलसारख्या महत्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणे न्यूझीलंडसाठी सोपे काम नसेल. मात्र आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत न्यूझीलंड संघाने दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला आहे.

आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंड संघाच रेकॉर्ड जबरदस्त

आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये दोन्ही संघ 11 वेळा आमनेसामने आले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात दोन्ही संघ फक्त दोनदा एकमेंकासोबत भिडले आहेत. यामध्ये दोन्ही संघांनी 1-1 असा विजय मिळवून बरोबरीत आहेत. त्याच वेळी विश्वचषकाच्या इतिहासात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 9 सामने झाले आहेत, ज्यामध्ये किवी संघाने 6 जिंकले आहेत तर आफ्रिकन संघ फक्त 3 वेळा जिंकण्यात यशस्वी झाला आहे.

आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्येही न्यूझीलंडचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. दोन्ही संघांमध्ये दोन आयसीसी नॉकआउट सामने खेळले गेले आहेत. दोन्ही वेळा न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. 2011 च्या आयसीसी विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत आणि त्यानंतर 2015 च्या आयसीसी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. त्यामुळे या दोन्ही संघातील हा अटीतटीची लढत होणार आहे.

न्यूझीलंड संघ : विल यंग, ​​डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, विल्यम ओ'रोर्क, जेकब डफी, काइल जेमिसन, मार्क चॅपमन, रचिन रवींद्र.

दक्षिण आफ्रिका संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जॉर्जियो, रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, एडेन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, वियान मुल्डर, मार्को जानसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन, लुंगी एनगिडी, कॉर्बिन बॉश.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+