T20WorldCup: दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास, अफगानिस्तानला पराभूत करत फायनलमध्ये दमदार प्रवेश
T20 विश्वचषक 2024 मधील अफगाणिस्तानचा प्रवास संपला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अफगाणिस्तानची फलंदाजी उद्ध्वस्त केली. 27 जून रोजी राशीद खानच्या नेतृत्वाखालील संघाचा 9 गडी राखून पराभव करून दक्षिण आफ्रिकेने प्रथमच विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली.
दक्षिण आफ्रिकेचा पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश
दक्षिण आफ्रिकेच्या भेदक माऱ्यामुळे अफगाणिस्तान संघाचा डाव 56 धावांवर आटोपला. मार्को यान्सेन, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा आणि ॲनरिक नॉर्टजे यांच्या गोलंदाजीपुढे अफगानिस्तानचे फलंदाज तग धरू शकले नाही.

दरम्यान, आज संध्याकाळी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या दुसरा सेमीफायनल सामना होणार आहे. तर 29 जून रोजी बार्बाडोस येथे फायनल होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली आहे.
राशीद खानचा निर्णय चुकीचा ठरला
त्रिनिदादमध्ये नाणेफेक जिंकून राशीद खानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने पहिल्याच षटकात सामन्याचा कल स्पष्ट झाला. यान्सेनने पहिल्याच षटकात रहमानउल्ला गुरबाजला शून्यावर बाद केले. केशव महाराजच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला तात्पुरता दिलासा मिळाला.
अफगाणिस्तानचे फलंदाज एका पाठोपाठ तंबूत
यान्सेनने गुलबदिन नायबला बाद केले आणि त्यानंतर कागिसो रबाडाने पुढच्याच षटकात इब्राहिम झद्रान आणि मोहम्मद नबी यांना बाद करून अफगाणिस्तानला अडचणीत आणले. उमरझाईही भेदक माऱ्यापुढे टीकू शकला नाही.
HISTORIC MOMENT IN SOUTH AFRICAN CRICKET. 🏆
— Johns. (@CricCrazyJohns) June 27, 2024
- INTO THE FINAL FOR THE FIRST TIME IN MEN'S WORLD CUP HISTORY...!!!! pic.twitter.com/zgRzU0I8Qx
राशीद खान आणि करीम जनात यांनी 22 धावांची छोटीशी भागीदारी करत अफगाणिस्तानला 50 धावांपर्यंत पोहोचवले. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा फिरकपटू शम्सीने अफगानिस्तानच्या इतर खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
सेमी फायनलमध्ये अफगाणिस्तानची सर्वात कमी धावसंख्या
शम्सी याने जनात आणि नूर यांना बाद केले. राशीदशी भिडणाऱ्या नोर्टजेने अफगाण कर्णधाराचा ऑफ स्टंप उडवला. अफगाणिस्तानच्या 56 धावा ही टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील कोणत्याही संघाची सर्वात खराब धावसंख्या आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. फजलहक फारुकीने क्विंटन डी कॉकला लवकर बाद करून अफगाणिस्तानला थोडी आशा दिली.
दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा ठपका
दक्षिण आफ्रिकेच्या संघाला आतापर्यंत चोकर्स म्हणून ओळखले जात होते. कारण आतापर्यंत झालेल्या प्रत्येक वर्ल्डकपमध्ये सुरुवातीला जोरदार कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ महत्त्वाच्या सामन्यांमध्ये पराभूत होत असतो. त्यामुळे त्यांना चोकर्स म्हटले जाते. फायनलमध्ये प्रवेश करत आफ्रिकेने हा ठपका पुसला आहे.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या संघाने केवळ 8.5 षटकांतच आव्हान पार करत फायनलमध्ये प्रवेश केला. आज संध्याकाळी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात दुसरा सेमी फायनल सामना होणार आहे. या सामन्याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे.












Click it and Unblock the Notifications