RR vs CSK: प्यार छुपता नही! IPL मॅचमध्ये या क्रिकेटरसोबत दिसली मलायका अरोरा! डेट करतेय का? वाचा
IPL 2025 RR vs CSK malaika arora : बाॅलीवूडची सुंदरा, टाॅप अभिनेत्री आणि क्रिकेटची चाहती असलेली मलायका अरोरा राजस्थान विरुद्ध चैन्नई सामन्यात दिसली. तिच्यावर वारंवार कॅमेरा दिसत होता. लाखो दिलाची धडकन असलेली मलाईका एका खास व्यक्तीसोबत दिसली. त्यामुळे चाहत्यांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजलं आहे. त्या खास व्यक्तीची मलाईका मल्लिका तर होत नाही ना..अशी चर्चाही अनेकांत रंगली.
चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यादरम्यान मलायका अरोराने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा श्रीलंकेचा माजी दिग्गज कुमार संगकारासोबत मॅच एन्जॉय करताना दिसली. मलायका अरोराने यावेळी राजस्थान रॉयल्सचा टी-शर्ट घातला होता, ज्यावरून ती राजस्थानला सपोर्ट करण्यासाठी आल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

तुम्ही या दिग्गज व्यक्तीला डेट करत आहात? चाहत्यांचे प्रश्न
Is Sangakkara dating Malaika Arora ??#CSKvsRR
— Rajshekhar Pandey (@RooneyRaj285604) March 30, 2025
(RR vs CSK मलायका अरोरा) कुमार संगकारासोबत मलायका अरोरा पाहिल्यानंतर चाहते सोशल मीडियावर सतत प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, प्रेम लपवता येत नाही. आणखी एका यूजरने लिहिले की, मलायका अरोरा कुमार संगकाराला डेट करत आहे? या दाव्यात किती तथ्य आहे हे स्पष्ट झालेले नाही. पण चाहत्यांना कुमार संगकारा आणि मलायका अरोरा यांच्याबद्दल सतत उत्सुकता आहे आणि ते त्यांच्याबद्दल सतत कमेंट करत आहेत.
Malaika Arora in RR ???! 😭😭😭 pic.twitter.com/n1jbfZFoiL
— Shubh (@kadaipaneeeer) March 30, 2025
राजस्थान आणि चेन्नई यांच्यात झालेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि खलील अहमदने राजस्थानला पहिला धक्का दिला. त्याने पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र यानंतर नितीश राणा मैदानात आला आणि स्फोटक शैलीत फलंदाजी केली. त्याने 21 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि राजस्थानला मोठ्या धावसंख्येकडे नेले.
Malaika Arora and Kumar Sangakara together in Guhawati supporting Rajasthan Royals #CSKvRR #CSKvsRR pic.twitter.com/TKx1aRTcxh
— Aman Deep Saxena (@aman_saxena_03) March 30, 2025
चेन्नईचा 6 धावांनी पराभव
प्रत्युत्तरात चेन्नई संघ मैदानात उतरला तेव्हा चांगली बॅटींग सुरु झाली मात्र, कालांतराने एक-एक विकेट पडत गेली आणि शेवटच्या तीन ते चार ओव्हरसाठी महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जाडेजा यांची जोडी मैदानात उतरली ही जोडी मैदानात होती तोपर्यंत चेन्नईला विजयाची आशा होती. धोनीने झटपट धावा काढल्या पण तो झेलबाद झाला. त्यानंतर मात्र चेन्नईच्या आशा संपल्या, शेवटी चेन्नईला 6 धावांनी पराभव स्विकारावा लागला.
Malaika Arora in the rr dugout
— Bhargav (@Bhargav76605307) March 30, 2025
Watching csk vs rr❤️#CSKvsRR pic.twitter.com/im9ZweL9tI
चेन्नई सुपर किंग्ज : रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, रुतुराज गायकवाड (कर्णधार), विजय शंकर, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह, रवींद्र जडेजा, महेंद्र सिंह, रवींद्रन धिक्कार अश्विन, नूर अहमद, मथिशा पाथिराना, खलील अहमद. इम्पॅक्ट उप: शिवम दुबे, मुकेश चौधरी, डेव्हॉन कॉनवे, शेख रशीद, सॅम कुरान.
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तिक्षिना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे. इम्पॅक्ट सब: कुणाल सिंग राठोड, शुभम दुबे, फजलहक फारुकी, कुमार कार्तिकेय, युधवीर सिंग.












Click it and Unblock the Notifications