Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रोहित शर्माच्या मुलाचं नाव अखेर ठरलं..! स्वतः पत्नी रितिकाने केलं जाहीर; पहा काय ठेवलंय नाव...

Rohit Sharma Baby Boy Name- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला काही दिवसांपूर्वी पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. पत्नी रितीका सजदेह ही सोशल मीडियावर चांगली अँक्टीव्ह असते. पुत्ररत्न प्राप्त होऊनही या जोडप्याने अद्याप मुलाच्या नाव ठेवलंलं नव्हतं. त्यामुळे रोहितच्या मुलाचं नाव काय..? हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. अखेर पत्नी रितिकाने आपल्या मुलाचं नाव काय आहे, हे थेट सोशल मीडियाद्वारेच सांगून टाकलंय.

Rohit Sharma

रोहितला दुसऱ्यांदा झाला पप्पा

रोहीत शर्मा व रितिका यांना १५ नोव्हेंबरला पुत्ररत्न प्राप्त झाले. यापूर्वी या दोघांना समायरा नावाची मुलगी आहे. आता याच समायराच्या लहान भावाचं नाव काय, हा प्रश्न विचारला जात होता. मुलाच्या जन्मानंतर रोहितने काही वेळ कुटुंबाला देता यावा म्हणून, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून माघार घेतली होती. बीसीसीआयनेही त्याची विनंती मान्य करत पहिल्या कसोटीत जसप्रीत बुमराह याच्याकडे कर्णधारपद दिलं होतं. बुमराहनेही विजयी सुरुवात करुन दिली. कर्मधारपदाच्या आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने संघाला विजय मिळवून दिला होता.

मुलाचं नाव तीन अक्षरीच ठेवलं

रोहित व रितिका या दोघांचीही नावे तीन अक्षरीच आहेत. त्यांनी आपल्या मुलीचे नाव समायरा म्हणजेच चार अक्षरी ठेवले आहे. त्यामुळे मुलाचं नावही ते चार अक्षरीच ठेवतील, असा काहींचा अंदाज होता. मात्र आता रितिकाने आपल्या मुलाचं नाव जाहीर करत ते तीन अक्षरीच असल्याचं दाखवून दिलं आहे. म्हणजेच आई-वडिलांप्रमाणेच आता मुलाचं नावही तीन अक्षरीच आहे. रितिकाने आपल्या मुलाचं नाव अहान असल्याचं सांगितलं आहे. रितीकाने इंस्टा स्टोरीवर एक फोटोद्वारे आपल्या मुलाचं आणि समायराच्या छोट्या भावाचं नाव जगजाहीर केलं आहे.

काय आहे रितीकाच्या इंस्टा स्टोरीत?

रितीकाने ख्रिसमस थीमवर आधारीत फॅमिली फोटो शेअर केला आहे. रितीकाने या फोटोत चौघांची नावं दिली आहेत. त्यानुसार रोहित शर्माचा रो, रितीकाचा रित्स, मुलगी समायराचं सॅमी आणि मुलाचं नाव अहान असं स्पष्टपणे दिसत आहे. रितीकाने यासह या इंस्टा स्टोरीत ख्रिसमिस हा हॅशटग वापरला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचं नाव काय ठेवलंय, हे समजून येतंय. रोहित शर्मा आणि रितीका सजदेह या दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानतंर 2015 मध्ये विवाहित झाले. रोहित आणि रितीका 13 डिसेंबर 2015 रोजी विवाहबंधनात अडकले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+