Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रोहीत शर्माची या 'गोलंदाजी'विरुद्ध सुमार कामगिरी! 16 महिन्यात 12 वेळा आऊट, स्ट्राईक रेटही खास नाही

Rohit Sharma's poor performance against left-arm pacer bowlers : आपल्या बॅटींगच्या जोरावर भल्या भल्या गोलंदाजांना अरबी समुद्राचे पाणी पाजणारा मुंबईचा स्टार खेळाडू रोहीत शर्माने आपल्या कारकि‍र्दीत यशाचा शिखर गाठला हा खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधारही बनला. विशेष म्हणजे त्याच्या कारकि‍र्दीत भारताने तीन विश्वचषक जिंकले. एवढे यश मिळवणाऱ्या फलंदाजाला हे गोलंदाज त्रस्त करत आहेत, ही बाब ऐकूण धक्का बसला असेल.

पण ही गोष्ट खरी आहे, काही गोलंदाज असे आहेत, जो रोहीत शर्माला त्रस्त करीत आहेत, गेल्या काही काळात रोहीत शर्माकडून मोठी खेळी झालेली नाही. खराब फाॅर्ममुळे त्याच्या निवृत्तीचीही चर्चा होत राहीली हे विशेष..

Rohit Sharma s poor performance against left-arm pacer bowlers

अनेकदा हा धुरंधर फलंदाज निवृत्त होत असल्याचे वृत्त आले आणि त्याचे थेट खंडनही रोहीत शर्माने जाहीर पत्रकार परिषदेतून केले आहे. नुकतेच आयपीएल सत्रातील एका पत्रकार परिषदेतही त्याला हाच प्रश्न छेडण्यात आला होता. त्यावर त्याने या अफवा असून त्याकडे लक्ष न देण्याचे सांगितले होते, ही चर्चा थांबली असली तरीही आकडेवारी काही वेगळीच आहे.

रोहीत शर्माला हा गोलंदाज करतोय त्रस्त

रोहीत शर्मा आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळता. काल 7 एप्रिलला झालेल्या आयपीएलच्या राॅयल चॅलेंजर बंगळुरू सामन्यात त्याने नऊ चेंडूत सतरा धावा केल्या, यात एक सिक्सर आणि दोन खणखणीत चौकारांचा समावेश होता. मात्र, त्याला यश दयाल या गोलंदाजाने आऊट केले आणि रोहीत शर्माची झंझावाती खेळी थांबली.

जलद डावखुऱ्या गोलंदाजाचा बनतोय शिकार

  • रोहीत शर्मा गेल्या वर्षी म्हणजेच 2024 पासून जलदगती डावखुऱ्या गोलंदाजाविरुद्ध 16 महिन्यात 26 इनिंग्ज खेळल्या.
  • 26 इनिंग्जमध्ये रोहीत शर्माला 12 वेळा जलदगती डावखुऱ्या गोलंदाजांनी त्याला आऊट केले आहे. म्हणजेच जलदगती डावखुऱ्या गोलंदाजाविरुद्ध खेळताना त्याची कामगिरी फारशी चांगली नाही.
  • या 26 इनिंग्जमध्ये त्याने 157 मॅचमध्ये 249 धावा केल्या.
  • रोहीत शर्माची बॅटींग सरासरी नगण्य म्हणजेच 20.75 एवढी आहे.
  • या सर्व सामन्यात रोहीत शर्माची स्ट्राईक रेट 160 इतका आहे.

रोहीत शर्मा मुंबई संघ सोडू शकतो का?

रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली पाच वेळा संघाला विजयी केले आहे. पण आता त्याचा वापर फक्त एक इम्पॅक्ट प्लेयर म्हणून केला जात आहे. इतक्या मोठ्या खेळाडूसोबत असे करणे चुकीचे आहे.

आगामी सामन्यांमध्येही रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे कठीण आहे. त्याचा फॉर्म त्याला साथ देत नसल्याने त्याला इम्पॅक्ट प्लेयरच्या यादीतून वगळले जाण्याचीही शक्यता आहे. जर रोहित निवृत्ती घेऊन मुंबई इंडियन्स सोडू शकत नसेल तर तो फिटनेचा मुद्दा उपस्थित करून संघ सोडू शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+