Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रोहीत शर्माचा मोठा सन्मान होणार! मुंबई क्रिकेट संघटनेने घेतला हा 'लय भारी' निर्णय, ऐकून अभिमान वाटेल

Rohit Sharma's name to be given to a stand in Wankhede Stadium : भारताचा स्टार फलंदाज आणि महाराष्ट्राचा सुपूत्र रोहीत शर्मा याचा गौरव करावा तितका कमी आहे कारण त्याने आपल्या बहारदार फलंदाजीच्या जोरावर देशाचे नाव जगात उंचावले. मुंबईतील रायझिंग सन नंतर देशाचा क्रिकेटमधील सूर्य बनला. या खेळाडूचा आता मुंबई क्रिकेट असोसिएशन मोठा सन्मान करणार आहे.

रोहीत शर्मा असा फलंदाज आहे, ज्याच्या नैतृत्वात भारताने गेल्या दहा महिन्यात क्रिकेटमधील दोन जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्या. त्याने आपल्या खेळाने मुंबईचेही नाव मोठे केले आहे आणि याचमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनने रोहीत शर्माच्या अनोख्या सन्मानाचा एक मोठा निर्णय घेतला आहे.

Rohit Sharma s name to be given to a stand in Wankhede Stadium

रोहीत शर्माचा असा करणार सन्मान

लोकसत्ताच्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्मा याचे नाव वानखेडे स्टेडीयममधील एका स्टँडला देण्यात येणार आहे. रोहीत मुंबईचा खेळाडू, मुंबईकडूनच तो देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळला आणि आता आयपीएलमध्येही मुंबईकडूनच खेळत आहे.

Take a Poll

आपापल्या राज्यातील खेळाडूंचा सन्मान करण्याची प्रथा

मुंबईतून जागतिक पातळीवर पोहचलेला सचिन तेंडूलकर असो की, विराट कोहली किंवा आता रोहीत शर्मा आपापल्या राज्याचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंचा सत्कार, यथोचित सन्मान करण्याचा एक चांगला पायंडा त्या - त्या राज्यातील सरकारने किंवा स्थानिक क्रिकेट बोर्डाने पाडला आहे. यापुर्वी विराट कोहलीचे नाव अरुण जेटली स्टेडीयममधील एका स्टँडला देण्यात आले होते. आता रोहितचेही वानखेडे स्टेडीयममधील स्टँडला नाव देण्यात येणार आहे.

रोहित शर्मा का आहे मोठा खेळाडू

  • एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक द्विशतके करणारा रोहित शर्मा हा पहिला खेळाडू आहे.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके आणि ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 शतके झळकावणारा रोहित शर्मा हा क्रिकेट इतिहासातील पहिला फलंदाज आहे.
  • रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने 2018 मध्ये आशिया कप आणि निदाहास ट्रॉफी जिंकली. त्यानंतर विश्वचषक आणि चॅम्पियन ट्राॅफीही जिंकलेली आहे.

रोहित शर्माचा जन्म कधी झाला

रोहित गुरुनाथ शर्मा याचा 30 एप्रिल 1987 ला झाला. तो सध्या एकदिवसीय आणि कसोटी फॉरमॅटमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करतो. त्याला सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आणि सर्व काळातील महान सलामीवीरांपैकी एक म्हणून ओळखले जाते.

आयपीएलची पाच विजेतेपदं जिंकली

  • रोहितने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपदही भूषविले आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघाने पाच विजेतेपदे जिंकली आहेत.
  • 9 नोव्हेंबर 2013 रोजी ईडन गार्डन्स, कोलकाता येथे वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. ज्यामध्ये त्याने 177 धावा केल्या. 108 एकदिवसीय सामन्यांनंतर तो एक कसोटी सामना खेळला.
  • 23 जून 2007 रोजी त्याची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द आयर्लंड संघाविरुद्ध सुरू झाली.
  • रोहितने पहिला टी-20 सामना 19 सप्टेंबर 2007 रोजी इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळला होता.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+