Rohit Sharma Stand: रोहित शर्माची पत्नी रितिका सचदेह वानखेडे स्टेडियमवर का रडली, Video पाहून चाहते.
Rohit Sharma Stand Naming Ceremony News : 'मुंबईचा राजा' रोहित शर्मा, क्रिकेटमधील शांत संयमी व भारतातील सर्वात यशस्वी आणि महान क्रिकेटपटूंमध्ये रोहित शर्माचे नाव उच्च स्थानावर आहे.
गेल्या एका वर्षात, त्याच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. दरम्यान, त्याने टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यात वेगळा प्रसंग पाहायला मिळाला आहे, त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आहे रोहित शर्माच्या पत्नीचा आणि चाहत्यांना देखील तो व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. नेमकं काय घडलं, वाचा सविस्तर.

नेमकं काय घडलंय?
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने, मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या नावाने एक वेगळा स्टँड बनवला आहे. या स्टॅंणडचे अनावरण नुकतेच पार पडले. खरंतर, जेव्हा या स्टँडच्या उद्घाटन समारंभात रोहितचा सन्मान केला जात होता, तेव्हा त्याची पत्नी रितिका सजदेहच्या डोळ्यातून देखील अश्रु अनावर झाले.
If life gives you a chance , be like Ritika Sajdeh. She literally was in tears once R sharma stand was inaugurated. Proud wife❤️
— Rohaan (@Rohaan_926) May 16, 2025
ROHIT SHARMA STAND pic.twitter.com/gS5v1vD9Ad
कॅमेऱ्याची नजर लपवून तिने डोळे पुसले
उद्घाटन समारंभात रोहित शर्माचे पालक आणि पत्नी रितिका सजदेह देखील व्यासपीठावर उपस्थित होते. रोहितने त्याच्या पालकांना पुढे आणले, तर रितिका यावेळी भावूक झाल्याची पाहायला मिळाली. तिच्या डोळ्यातून अश्रु आले. परंतु, कॅमेऱ्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करताना तिने अखेर आपले अश्रूही पुसले. भावनिक होताना ती टाळ्या वाजवतानाही दिसली. रोहित शर्माच्या या सत्कार समारंभात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या मान्यवरांची उपस्थिती होती.
टी-20 आणि कसोटीतून घेतली निवृत्ती
रोहित शर्माने आता क्रिकेटच्या दोन्ही फॉरमॅटला अलविदा म्हटले आहे. 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने टी-20 क्रिकेटला अलविदा केला. मे 2025 मध्ये त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीलाही रामराम ठोकला आहे. आता तो फक्त एकदिवसीय संघात खेळताना दिसेल.
17 वर्षांपूर्वी झाली होती रितीकासोबत भेट
रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांचे डिसेंबर 2025 मध्ये लग्न झाले. रोहितने भारतीय क्रिकेटमध्ये खूप ओळख मिळवली होती. खरंतर, रोहित आणि रितिका यांची पहिली भेट 2008 मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान झाली होती. त्या काळात रितिका अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटूंसाठी स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करायची. लग्नानंतर रोहित आणि रितिका यांना समायरा नावाची एक मुलगी झाली. त्यानंतर काही वर्षाने त्यांना मुलगा झाला त्याचे नाव अहान आहे.












Click it and Unblock the Notifications