Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

चर्चा होणारच! चहल- धनश्री प्रकरणात रोहित शर्माची बायको कुणाच्या बाजूने? 'त्या' पोस्टला केलं लाईक

क्रिकेटपटू यजुवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोट नुकताच झाला. मात्र अद्यापही त्यांच्या चर्चा कमी होताना दिसत नाहीत. यजुवेंद्रने धनश्रीला फसवले असं काहींचं म्हणणं आहे तर धनश्रीचचं चुकतंय असंही काहींचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे या दोघांनीही घटस्फोटाच्या दिवशीच आपल्या कृतितून चुकीचं कोण, हे अनौपचारिक पद्धतीने सांगितलं होतं. कोर्टातून बाहेर पडताना यजुवेंद्र चहलने टी-शर्ट दाखवून तर, धनश्रीने तिचे गाणे रिलीज करुन आपली बाजू मांडली होती. आता याच कपलच्या चर्चेत कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहही सहभागी झाली आहे.

Rohit Sharma s wife supports Chahal

रितिका कुणाच्या बाजूने?

यजुवेंद्र चहल व धनश्री वर्मा यांच्या प्रकरणात रितिका कुणाच्या बाजूने आहे, हे एका व्हिडीओच्या लाईकमधून स्पष्ट झालं. त्याचं झालं असं की, युट्यूबर शुभांकर मिश्रा याने धनश्री वर्मावर टीका करणारा एक व्हिडीओ बनवला होता. लोक तिला गोल्ड डिगर म्हणू लागलेत, असं शुभांकर म्हणाला होता. शिवाय आता चहलचे फॅन्स धनश्रीला चांगलेच ट्रोल करत आहेत, असंही शुभांकर म्हणाला होता. शुभांकरचा हाच व्हिडीओ रोहित शर्माची पत्नी रितिका सचदेह हिने लाईक केला आहे. त्यानंतर रितिका कुणाच्या बाजूने आहे, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

रितिकाच्या लाईकच्या चर्चा

शुभांकरचा हा व्हिडीओ रितिकाने लाईक केला. म्हणजेच रितिका यजुवेंद्रच्या बाजूने आहे, असा अर्थ चाहत्यांनी काढला. या प्रकरणात रितिकाने धनश्रीला दोषी ठरवलंय, असंही लोकांचं म्हणणं आहे. कारण रितिकाने शुभांकरने धनश्रीची केलेली टिका लाईक केली होती.

दीड वर्षांपासून होते वेगळे

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे लग्न २०२० मध्ये झाले होते. ५ वर्षातच दोघांचाही घटस्फोट झाला. २० मार्च रोजी त्याचा घटस्फोट झाला. ते गेल्या १८ महिन्यांपासून वेगळे राहत होते. घटस्फोटाच्या दिवशी, चहलचे वकील नितीन कुमार गुप्ता यांनी एएनआयला सांगितले की, "न्यायालयाने घटस्फोटाचा आदेश दिला आहे आणि आता पक्ष पती-पत्नी राहिलेले नाहीत." सध्या युजवेंद्र चहल आयपीएममध्ये व्यस्त आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+