Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025: ना धोनी, ना विराट; IPL मध्ये 'या' भारतीय खेळाडूच्या नावावर सर्वाधिक 'प्लेअर ऑफ द मॅच'

व्यावसायिक क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखला जाणारा आयपीएल-२०२५ चा १८ वा सिझन पुढच्या आठवड्यात सुरु होणार आहे. या मेगा टी-20 लीगचा हा हंगाम 22 मार्चपासून सुरू होईल. या स्पर्धेसाठी सर्वच संघ सज्ज झाले आहेत. परंतु आयपीएलच्या इतिहासात असे काही खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या गुणवत्तेवर नवनवे रेकाँर्ड करुन ठेवले आहेत. त्यापैकी सर्वाधिक वेळा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकणाऱ्या टाॅप थ्री खेळाडूंच्या यादीत भारताचा एक हिराही आहे. भारतीय खेळाडूंच्या यादीत हाच खेळाडू सर्वात वरती आहे.

IPL s most capped player

झालेत अनेक रेकाॅर्ड

आयपीएलने आतापर्यंत 17 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. या काळात अनेक रेकाॅर्ड झाले. या रेकाॅर्डच्या यादीत मॅचविनिंग खेळाडूंचीही एक मोठी यादी आहे. या लीगमध्ये असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी सामनावीराचा पुरस्कार पटकावला आहे. या यादीत दिग्गजांची नावे आहेत. यादीत विराट कोहलीचे नाव देखील समाविष्ट आहे. पण तो टॉप-3 मध्ये नाही. या यादीत टाॅप थ्रीमध्ये दोन विदेशी खेळाडू आहेत तर रोहित शर्माचा तिसरा क्रमांक आहे. रोहितने आत्तापर्यंत १९ वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकला आहे.

रोहित शर्माचा रेकाॅर्ड

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात दिग्गज सलामीवीर फलंदाजांपैकी एक आहे. हा स्टार फलंदाज आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून खेळत आहे. रोहित शर्माने 2008 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर तो मुंबई इंडियन्सचा भाग बनला. अजूनही त्याच संघाकडून तो खेळत आहे. त्याने या लीगमध्ये 257 सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने त्याने 19 वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. भारतीय खेळाडूंच्या आयपीएल इतिहासात एकमेक रोहितच टाँप थ्रीमध्ये आहे.

एबी आणि ख्रिस टाॅपला

आयपीएलच्या इतिहासात साऊथ अफ्रिकेचा एबी डिव्हिलीयर्स याने २५ वेळा सामनाविर पुरस्कार पटकावला आहे. तो टाॅपला आहे. त्याने १८४ सामने खेळले आहेत. तर वेस्ट इंडिजचा तडाखेबंद फलंदाज ख्रिस गेल याने २२ वेळा हा पुरस्कार मिळवला आहे. त्याने यासाठी १४२ सामने खेळले आहेत. या दोन्ही खेळाडूंपर्यंत आत्तापर्यंत कुणीच पोहेचलेले नाही. मात्र रोहित शर्माला हे रेकाँर्ड तोडण्याची संधी आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+