Happy Birthday Rohit Sharma : हिटमॅन रोहीत शर्माला द्या खास मराठीत शुभेच्छा
Happy Birthday Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार आणि 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा उद्या आपला 38वा वाढदिवस साजरा करत आहे. 30 एप्रिल 2024 रोजी त्याचा वाढदिवस असला तरी त्याच्या चाहत्यांनी आणि क्रिकेट विश्वाने त्याला प्री-बर्थडे शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
रोहित शर्मा हा एक उत्तम सलामीवीर आणि उत्तम पुल शॉट खेळणारा खेळाडू म्हणून ओळखला जातो. रोहितने वनडे क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतके आणि 2019 च्या विश्वचषकात पाच शतके ठोकली आहेत. त्याच्या या यशामुळे तो सर्वकाळातील सर्वोत्तम सलामीवीरांपैकी एक मानला जातो.

रोहितचा खास पुल शॉट
रोहित शर्माचा पुल शॉट हा त्याच्या खेळाचा सर्वात आवडता शॉट आहे. रोहित शर्मा पेक्षा उत्तम पुल शॉट कोणीच खेळत नाही. या शॉटमध्ये त्याची टायमिंगचा उत्तम समन्वय दिसतो. 2019 च्या विश्वचषकात त्याने पाच शतके ठोकली, ज्यामध्ये त्याचा पुल शॉट खूप प्रभावी ठरला. रोहितने स्वतः एकदा सांगितले की, तो सरावादरम्यान या शॉटवर विशेष मेहनत घेत नाही, तर हा त्याचा नैसर्गिक खेळ आहे.
त्याच्या या शॉटमुळे तो 'हिटमॅन' म्हणून ओळखला जातो. सनिल गावसकर यांनी त्याच्या खेळाची तुलना विरेंद्र सेहवाग आणि विव रिचर्ड्स यांच्यासोबत केली आहे. गावसकर म्हणतात की, रोहित एकदा खेळायला लागला की थांबत नाही, आणि त्याला मोठ्या शतकांचा छंद आहे. हे त्याच्या पुल शॉटमधून स्पष्ट होते, ज्यामुळे तो गोलंदाजांना धक्का देतो.
रोहितच्या नेतृत्वाखाली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली
हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये इतिहास रचला. दुबईत खेळल्या गेलेल्या या शानदार अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने भारतासाठी तिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून एक इतिहास रचला आहे.
दरम्यान टीम इंडियाला चॅम्पियन बनवल्यानंतर रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. रोहित शर्माने कोणीही निवृत्त होत नसल्याचे परिषेदत सांगितलं. रोहित शर्माने क्रिकेटच्या मैदानावर भरपूर धावा केल्या आहेत, परंतु कमाईच्या बाबतीतही त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. आज त्यांच्याकडे सुमारे 215 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 30 कोटी रुपयांचे आलिशान घर आहे. तसेच त्यांच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत.
रोहित शर्मा हा बीसीसीआयच्या ग्रेड ए प्लस श्रेणीतील खेळाडू आहे. बीसीसीआय त्याला दरवर्षी 7 कोटी रुपये देते. रोहित शर्माला क्रिकेट सामने खेळण्यासाठीही भरपूर पैसे मिळतात. एका कसोटीसाठी त्याला 15 लाख रुपये तर एका एकदिवसीय आणि एका टी-20 साठी अनुक्रमे 6 लाख आणि 3 लाख रुपये फी मिळते. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला 16.30 कोटी रुपयांना रिटेन केले. त्याने आयपीएलमधून 178 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
आयपीएल 2025 च्या सीझनमध्ये सुरुवातीच्या सामन्यात रोहीत बॅटमधून धावा निघत नव्हत्या. मागील दोन सामन्यात रोहीतने अर्धशतक झळकावून दमदार पुनरागमन केलं आहे. उद्या 30 एप्रिल रोजी रोहीत शर्माचा वाढदिवस आहे. तो उद्या आपला 38 वा वाढदिवस साजरा करणार आहे. या निमित्त टीम इंडियाच्या हिटमॅनला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काही खास शुभेच्छा संदेश देत आहेत.
हिटमॅन रोहीत शर्माला द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
पुलशॉटचा बादशाह रोहीत शर्माला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हिटमॅन रोहीत शर्माला
वाढदिवसाच्या शुभेच्छा

शतकातील महान खेळाडूला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज तुमचा दिवस आहे
मजा करा आणि पूर्ण आनंद घ्या
रोहीत शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
तू फक्त एक उत्कृष्ट खेळाडूच नाहीस
तर क्रिकेट संघातील एक रॉक स्टार देखील आहेस
असेच चालू ठेव रोहीत. वाढदिवसाच्या शुभेच्छा...

संघात नेहमीच उत्साह भरून उत्कृष्टता
देण्यासाठी उत्साह भरणाऱ्या सर्वात
सर्वात महान क्रिकेटपटूला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा...
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा रोहीत सर..
100 वर्षे दीर्घायुष्य लाभो..
तुम्ही जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू आहात.

आपल्या दृढनिश्चयाने आणि गुणवत्तेने
अब्जावधी क्रिकेटप्रेमींचे मने जिंकणा-या
रोहीत शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छ..!
आयुष्यात आव्हानात्मक गोष्टी करण्यासाठी
तू नेहमीच प्रेरणादायी व्यक्ती आहेस.
आम्हाला उत्तम गोष्टी करण्यासाठी प्रेरणा देत राहा
रोहीत शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा...!

क्रिकेटपटू येतील आणि जातील
पण तुम्ही, तुमची फलंदाजीची शैली
आणि दर्जा नेहमीच लक्षात राहील...
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कोणाच्या पुढे न झुकता,
बिनधास्त कसं लढायचं
हे रोहीत शर्माने शिकवलं
मुंबईच्या या राजाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुमचा जन्मदिवस खास आणि आनंददायक असो
तुमच्या आयुष्यात सर्व इच्छा पूर्ण होवोत
टीम इंडियाच्या लाडक्या हिटमॅनला
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
आजच्या दिवशी, तुमच्या प्रत्येक
इच्छेला आणि प्रत्येक स्वप्नाला
साकार होण्याची आशा करत आहे
तुमचं जीवन सदैव आनंदाने भरलेलं राहो
वाढदिवसाच्या शुभेच्छा रोहीत शर्मा !
तुमच्या जन्मदिवसाच्या खास दिवशी
तुमचं प्रत्येक स्वप्न आणि इच्छा पूर्ण होवो
तुमच्या जीवनात प्रेम आणि आनंदाचा
दीप नेहमी प्रज्वलित राहो.
जन्मदिनाच्या शुभेच्छा रोहीत शर्मा!

आज आपला वाढदिवस,
आपल्या जीवनातील प्रत्येक दिवस
असा आहे की देशातील
प्रत्येक व्यक्तिला आपला हेवा वाटतो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रोहीत शर्मा!
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,
ह्याच आमच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा !
या जन्मदिवसाच्या खास दिवशी तुमच्या आयुष्यात सुख
आनंद, यश आणि कीर्ती यांची भरभराट असो...
तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट सुंदर होवो
हीच ईश्वर चरणी प्रार्थना...
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रोहीत शर्मा!
वर्षाचे 365 दिवस..
महिन्याचे 30 दिवस..
हफ्त्याचे 7 दिवस..
आणि माझ्या आवडीचा 1 दिवस..
तो म्हणजे रोहीत शर्माचा वाढदिवस.
वाढदिवसाच्या मनः पूर्वक शुभेच्छा हिटमॅन!

हास्य तुझ्या चेहऱ्यावरून कुठेच जाऊ नये
अश्रू तुझ्या डोळ्यात कधीच येऊ नये
पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा हिच परमेश्वर चरणी प्रार्थना...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहीत शर्मा!
आपणास आजच्या शुभदिनी,
शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता,
पुरांदाराची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता
अन शिवचरणी प्रार्थना लाभो हीच मना पासून इच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रोहीत शर्मा...!

येणाऱ्या प्रत्येक वर्षी आपल्या
वाढदिवसाच्या निमित्ताने
तुमच्या जीवनात नवनवीन यश
स्थैर्य आणि आनंद येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रोहीत शर्मा!
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका







Click it and Unblock the Notifications