Video : मालदीवची सुट्टी एन्जॉय करुन रोहित मायदेशी परतला, कुटुंबाचा फोटो काढल्याने राग अनावर
Rohit Sharma: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित शर्मा त्याच्या कुटुंबासह मालदीवच्या सुट्टीवर दिसला गेला होतो. रोहित शर्माने गेल्या काही दिवसांपासून त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक फोटो पोस्ट केले होते. स्पर्धेनंतर तो मालदीवला गेल्याचे उघड झाले.
आयपीएल सुरु होण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्याआधी रोहीत शर्मा आपल्या कुटूंबासह विदेशात गेला होता. त्यावेळी मायदेशत परतल्यानंतर विमानतळावर राग अनावर झाला.

विमानतळावर रोहित शर्माची एक वेगळीच बाजू दिसली. जेव्हा भारतीय कर्णधार विमानतळावर आला तेव्हा काही फोटोग्राफरनी त्याला घेरले आणि रोहित शर्माला ते आवडले नाही. सर्वजण त्याला फोटो मागत असताना त्याचा राग स्पष्ट दिसत होता. रोहित शर्माने फोटोग्राफर्संना मागे जाण्यास सांगितले, त्यापैकी एकाला मागे ढकलले आणि नंतर त्याच्या मुलीला गाडीत बसवले. मग तो फोटोसाठी पुढे आला. काही फोटो देताना रोहीतने स्मित हास्य दिलं. काही क्षणांचा राग नंतर हास्यामध्ये बदलला आणि त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
मुंबई इंडियन्स आयपीएल सामना
मुंबई इंडियन्स 23 मार्च रोजी आयपीएलमध्ये आपला पहिला सामना खेळणार आहे. हा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध असेल आणि चेन्नईमध्ये होणार आहे. दोन्ही संघांमधील सामना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दोन्ही संघात हाय-व्होल्टेज सामना होण्याची अपेक्षा आहे.
रोहित शर्मा कर्णधार ?
हार्दिक पंड्याच्या जागी रोहित शर्मा पहिल्या सामन्यात कर्णधारपद भूषवू शकतो. गेल्या हंगामात तीन वेळा स्लो ओव्हर रेट केल्यानंतर बंदीमुळे पंड्या खेळू शकणार नाही अशी शक्यता आहे. जर ओव्हररेट नियमाचे तीन वेळा उल्लंघन केले तर कर्णधारावर एका सामन्याची बंदी घातली जाते. गेल्या हंगामात मुंबईने त्यांच्या शेवटच्या सामन्यात तिसऱ्यांदा स्लो ओव्हर्स टाकल्या होत्या, आता त्यावर कारवाई केली जाईल.












Click it and Unblock the Notifications