Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रोहित - विराट कोहली किती दिवस क्रिकेट खेळणार? 'या' खेळाडूने केला मोठा खुलासा

Rohit sharma And Virat Kohli : विराट कोहलीचा फिटनेस पाहता तो पुढील पाच वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेल,असं मत भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने व्यक्त केलं आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणखी किमान दोन वर्षे आपली कामगिरी कायम ठेवू शकेल, असं ही त्याने म्हटलं आहे.

रोहित-कोहलीबद्दल भज्जीने पीटीआयशी बोलताना सांगितले की, रोहित आणखी दोन वर्षे सहज खेळू शकतो. विराट कोहलीच्या फिटनेसबद्दल तुम्हाला माहिती नाही. तुम्ही त्याला पुढील पाच वर्षे स्पर्धा करताना पाहू शकता. तो कदाचित संघातील सर्वात फिट असलेल्या खेळाडू आहे. हरभजनने कसोटी क्रिकेटमध्ये विराट-रोहीत सारखे अनुभवी खेळाडुंना महत्व असल्याचं सांगितले.

Rohit- Virat

काय म्हणाला भज्जी ?

लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये या दोन खेळाडूंनी लोकांच्या अपेक्षेपेक्षा थोडे जास्त खेळण्याची गरज आहे. तुम्हाला सर्व फॉरमॅटमध्ये अनुभव आवश्यक आहे, मग ते मर्यादित षटकांचे क्रिकेट असो किंवा कसोटी क्रिकेट. उदयोन्मुख टॅलेंट तयार करण्यासाठी तुम्हाला अनुभवी क्रिकेटपटूंची गरज आहे. संघातील उदयोन्मुख प्रतिभेला मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी खेळाडूंची गरजही त्यांनी अधोरेखित केली. जर कोणता खेळाडू चांगली कामगिरी करत नसेल तर त्याला निवड समितीने संघातून बाहेर काढायला हवं, असं हरभजन म्हणाला. मग तो वरिष्ठ खेळाडू असो वा कनिष्ठ. पण जोपर्यंत प्रत्येकजण फिट आहे तोपर्यंत त्यांची संघात निवड झाली पाहिजे.

तरुण खेळाडूंच्या तुलनेत

अनेक वर्षे खेळत असलेल्या वरिष्ठ खेळाडूंपेक्षा युवा खेळाडूंना अधिक धावांची भूक असते. जर तुम्ही 15 वर्षे खेळलात तर तुमची भूक थोडी कमी होते. रियान पराग,यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांसारख्या तरुण खेळाडूच्या कामगिरीबद्दल आणि त्यांना मिळत असलेल्या संधींबद्दल त्याने प्रशंसा केली.

हरभजन म्हणाला की, रियान परागला संधी मिळणे आणि यशस्वी जैस्वाल, शुभमन गिलची कामगिरी पाहणे खूप छान आहे. राष्ट्रीय संघात निवडीसाठी कामगिरी आणि तंदुरुस्ती हा मुख्य निकष असायला हवा.जर असे खेळाडू कोणत्याही प्रकारे योगदान देत नसतील, मग ते फिटनेस असो किंवा धावांची संख्या अशा खेळाडूंनी तरुणांसाठी संधी उपलब्ध करुन द्यायला हवी.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+