Rivaba jadeja : रविंद्र जडेजाच्या पत्नीला मोठी लाॅटरी! थेट बनली मंत्री, जाणून घ्या रिवाबा जडेजाबद्दल
Rivaba jadeja sworn in gujarat minister : भारतीय राजकारणात आणि विशेषतः गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रवींद्र जडेजा यांची पत्नी आणि जामनगर उत्तरच्या आमदार रिवाबा रवींद्र जडेजा यांनी आज (शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०२५) गुजरातच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतली.
प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा या आता मंत्री बनल्या आहे. त्यांच्यावर मोठी राजकीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या गुजरातच्या नवीन मंत्रिमंडळात रिवाबा यांचा समावेश करण्यात आला आहे. जामनगर उत्तरच्या आमदार रिवाबा आता २६ सदस्यीय नवीन मंत्रिमंडळाचा भाग आहेत. यादरम्यान, रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली.

रविंद्र जडेजा पोहचला शपथविधीत
भारतीय अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा देखील त्यांच्या मुलीसह शपथविधी सोहळ्याला पोहोचला होता. पहिल्यांदाच आमदार झालेल्या रिवाबा जडेजा यांना राजकारणात अवघ्या तीन वर्षांत मिळालेली ही मोठी जबाबदारी भाजपच्या युवा नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याच्या धोरणाचा भाग असल्याचे मानले जात आहे.
रिवाबा जडेजा : अभियंता ते कॅबिनेट मंत्रीपदापर्यंतचा प्रवास
रिवाबा जडेजा यांचे माहेरचे आडनाव सोलंकी आहे) यांचा प्रवास अनेक दृष्टीने प्रेरणादायी ठरला आहे.
जन्म आणि शिक्षण: २ नोव्हेंबर १९९० रोजी राजकोट, गुजरात येथे जन्मलेल्या रिवाबा यांनी गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, अहमदाबाद येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली आहे.
रविंद्र जडेजाशी विवाह: २०१६ मध्ये त्यांचे लग्न स्टार क्रिकेटर रवींद्र जडेजा यांच्याशी झाले. या जोडप्याला निध्याना जडेजा ही एक मुलगी आहे.
राजकारणात प्रवेश: त्यांनी २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
आमदारकी: २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला होता.
सामाजिक कार्य: राजकारणासोबतच त्या महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यासाठी 'श्री मातृशक्ती चॅरिटेबल ट्रस्ट' चालवतात.
मंत्रिमंडळ फेरबदल आणि नवी जबाबदारी
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील गुजरात मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलानंतर (Cabinet Reshuffle) रिवाबा जडेजा यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. गांधीनगर येथील राजभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी त्यांचे पती रवींद्र जडेजा आणि त्यांची मुलगी निध्याना हे देखील उपस्थित होते.
का दिले रिवाबा यांना मंत्रिमंडळात स्थान?
रिवाबा यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजपने सौराष्ट्र भागात आपला प्रभाव अधिक मजबूत करण्याचा तसेच महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. अवघ्या तीन वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर लगेचच मंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्याने रिवाबा जडेजा यांच्या राजकीय भविष्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.












Click it and Unblock the Notifications