VIDEO: ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्नात एमएस धोनीचा खास हटके स्टाईल डान्स, व्हिडिओ व्हायरल
IPL 2025 : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि सीएसकेचा दिग्गज खेळाडू एमएस धोनीने ऋषभ पंतच्या बहिणीच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावली आहे. आनंदाच्या क्षणाचा टीम इंडियाच्या काही खेळाडूंनी पुरेपूर आनंद घेतला आहे. धोनी आणि सुरेश रैना डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये धोनी लग्नात मनापासून नाचताना दिसत आहे.
पंतच्या बहिणीच्या लग्नाचे समारंभ मसुरीमध्ये होत आहेत. धोनी आणि त्याचे कुटुंब 11 मार्च रोजी डेहराडूनला पोहोचले. चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचा भाग असलेला पंत सोमवारी सकाळी सेलिब्रेशनसाठी पोहोचला. धोनीचे पंत आणि त्याच्या कुटुंबाशी खूप चांगले संबंध आहेत.

एमएस धोनी रैनाचा डान्स व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये धोनी त्याचा माजी सहकारी सुरेश रैना आणि पंत यांच्यासोबत नाचताना दिसत आहे. येत्या काही दिवसांत विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील या सोहळ्यात सामील होऊ शकतात असे वृत्त आहे.
धोनी आणि पंत दोघेही आयपीएल 2025 च्या हंगामासाठी तयारी करत आहेत. धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करेल. लग्नाला उपस्थित राहण्यापूर्वी तो सीएसकेच्या प्रशिक्षण शिबिराला उपस्थित राहिला होता.
— Telugu Dhoni fans official 🤫 (@dhonsim140024) March 12, 2025
ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
पंत या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळणार आहे. 2025 च्या मेगा लिलावात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून त्याला विकत घेऊन लखनऊ सुपर जायंट्सचा संघ चर्चेत आहे. लखनऊचा कर्णधार म्हणून पंत एलएसजीसाठीच्या त्याच्या पहिल्या सामन्यात त्याच्या माजी संघ दिल्लीशी सामना होणार आहे.
गुरु- शिष्यात होणार लढाई
धोनीच्या सीएसके आणि पंतच्या एलएसजीमधील बहुप्रतिक्षित सामना आयपीएल 2025 मध्ये फक्त एकदाच आमनेसामने येणार आहेत. हा रोमांचक सामना 14 एप्रिल रोजी एकाना स्टेडियमवर होणार आहे. दोन क्रिकेट दिग्गजांमधील या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.












Click it and Unblock the Notifications