Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Rinku Priya engaged : क्रिकेटर रिंकु सिंग अन् प्रिया सरोज यांची ओळख कशी झाली? दोघांचे वेगळेपण काय?

Rinku singh gets engaged to mp priya saroj today : भारताचा स्टार क्रिकेटपटू रिंकु सिंग आणि खासदार प्रिया सरोज यांचा आज साखरपुडा पार पडला. एकमेकांसोबत जीवन जगण्याच्या त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आज साखरपुड्यात दोघांच्या पहिल्याच फोटोने चाहत्यांची मने जिंकली.

आज दिल्लीत पार पडलेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाचा रंगारंग आणखीनच उजळून आला जेव्हा बच्चन कुटुंबातील जया बच्चन, अनेक स्टार क्रिकेटरसह राजकीय नेते, सपा नेते आणि इतर दिग्गज मंडळी लग्नाला हजर होते. जवळपास तीनशेहून अधिक उपस्थित पाहुण्यांच्या साक्षीने या दोघांचा वांग-निश्चय अर्थात साखरपुडा पार पडला.

Rinku singh gets engaged to mp priya saroj today

नवाबी शैली आणि लखनऊ तहजीब

नवाबी शैली आणि लखनऊ तहजीबमध्ये, आज राजधानी लखनऊमध्ये एका खास प्रसंगाचे साक्षीदार अनेक क्रिकेटपटू आणि सिने कलाकारांसह राजकीय मंडळी झाले. क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न झाले. या भव्य रिंग सेरेमनीला ३०० हून अधिक पाहुण्यांनी हजेरी लावली.

कोण कोण आले साखरपुड्याला

रिंकू आणि प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याला राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मोठ्या व्यक्तींचा समावेश होता. विशेष म्हणजे सपा अध्यक्ष अखिलेश यादव, डिंपल यादव, जया बच्चन, इकरा हसन आणि राम गोपाल यादव यांसारखे प्रसिद्ध नेते देखील या हाय-प्रोफाइल कार्यक्रमाला उपस्थित होते. क्रिकेटपटू रिंकू सिंग आणि सपा खासदार प्रिया सरोज यांच्या एंगेजमेंटवर, सपा आमदार आणि प्रिया सरोजचे वडील तूफानी सरोज म्हणाल्या, 'आज एंगेजमेंट सेरेमन आहे आणि आम्ही त्यासाठी येथे जमलो आहोत. प्रिया सरोज आज एंगेजमेंट करत आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे.'

साखरपुड्याआधी मंदिरात घेतले दर्शन

रिंकुने साखरपु्ड्याआधी देवीच्या मंदिरात माथे टेकवले. तो कुटुंबासह उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील चौधरा वाली विचित्रा देवी मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी गेला होता. लखनऊमध्ये, दोघांचा साखरपुडा फुलांनी आणि आकर्षक रोषणाईने सजवलेल्या फुलकर्न हॉलमध्ये झाला. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांची पहिली भेट, ओळख कधी झाली?

प्रिया सरोज यांचे वडील समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी रिंकू आणि प्रिया यांच्या भेटीबद्दल सांगितले की, काही काळापासून एकमेकांना रिंकु सिंग आणि प्रिया सरोज ओळखतात. प्रियाच्या मित्राच्या वडिल क्रिकेटपटू असून त्यांनी दोघांची ओळख करून दिली होती. दोन्ही कुटुंबांच्या आशीर्वादाने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे," असे त्यांनी एनआय वृत्तसंस्थेला सांगितले.

रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचे वेगळेपण काय?

रिंकू सिंग हा मूळचा अलीगढचा रहिवासी आहे आणि आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध एकाच षटकात सलग 5 षटकार मारून त्याने कोलकाता नाईट रायडर्ससाठी शानदार विजय मिळवला. क्रिकेटमध्ये क्वचितच अशी कामगिरी होते, तर प्रिया सरोज यांनी मच्छलीशहरमधून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. ती 2024 मध्ये निवडून आलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात तरुण खासदार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+