Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Rinku singh father death : रिंकू सिंगवर दुःखाचा डोंगर! वडिलांचे निधन, मृत्यूचे 'हे' आहे मोठे कारण

Rinku singh father khachandra singh passes away : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंग आणि त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. रिंकूचे वडील खचंद्र सिंह यांचे वयाच्या ६० व्या वर्षी ग्रेटर नोएडा येथील यथार्थ रुग्णालयात निधन झाले. ते गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत होते.

Rinku singh father khachandra singh passes away

दुःखद घटनाक्रम

रिंकू सिंगचे वडील खचंद्र सिंह यांना 'स्टेज-४ लिव्हर कॅन्सर' (यकृत कर्करोग) होता, यामुळे त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अत्यंत खालावली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांना मेकॅनिकल व्हेंटिलेटर (लाईफ सपोर्ट) वर ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

...अन् धावून आला रिंकू

टीम इंडिया सध्या टी-२० विश्वचषकाच्या (सुपर-८) सामन्यांसाठी तयारी करत आहे. २६ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासाठी रिंकू चेन्नईत होता. मात्र, वडिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजताच, तो सराव सत्र सोडून मंगळवारी सकाळी तातडीने आपल्या कुटुंबाकडे पोहोचला. वडिलांच्या निधनामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वडिलांचा होता खूप मोठा संघर्ष

रिंकू सिंगच्या यशात त्याच्या वडिलांचा मोठा वाटा होता. रिंकू आयपीएल आणि भारतीय संघात चमकल्यानंतरही, त्याचे वडील अलिगडमध्ये घरोघरी जाऊन एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचवण्याचे काम करत असत. रिंकूने अनेकदा आपल्या संघर्षाच्या दिवसात वडिलांच्या मेहनतीचा उल्लेख केला होता. आपल्या पहिल्या कमाईतून त्याने वडिलांना एक आलिशान घर आणि त्यांची आवडती स्पोर्ट्स बाईक भेट दिली होती.

साध्या कुटुंबातून, हालाकीच्या स्थितीतून रिंकुच्या वडीलांनी परिस्थितीशी झुंज देत आपल्या मुलाला (रिंकू सिंग) स्टार क्रिकेटर बनवले आहे. रिंकूसाठी त्याचे वडील हिरो होते, त्यांच्या जाण्याने "रिंकूच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधारवड हरपला असून, एका जिद्दी पित्याचा संघर्षमय प्रवास आज संपला आहे." या घटनेनंतर क्रिकेट चाहत्यांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+