Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

व्हिडिओ बघा.. एका चेंडूत फटकावल्या 22 धावा! आरसीबीच्या खेळाडूचा अद्भुत, अविश्वसनीय पराक्रम!

RCB player Romeo Shepherd scores 22 runs in one ball : कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL) सध्या जोरदार सुरू आहे. लीगच्या १३व्या सामन्यात, सेंट लुसिया किंग्ज आणि गयाना अमेझॉन वॉरियर्स यांच्यात झालेल्या लढतीत, आरसीबीचा खेळाडू रोमारियो शेफर्डने एकाच चेंडूत २२ धावा काढून क्रिकेट जगतात खळबळ माजवली आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबीला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि आता कॅरीबीयन प्रिमियर लिग- सीपीएलमध्येही त्याने हा अनोखा विक्रम रचला आहे.

RCB player Romeo Shepherd scores 22 runs in one ball

कसा झाला हा विक्रम?

सामन्याच्या 15 व्या षटकात, गयानाच्या डावावेळी ओशेन थॉमस गोलंदाजी करत होता. त्यावेळी रोमारियो शेफर्ड फलंदाजी करत होता.

नो बॉलने सुरुवात: ओशेन थॉमसने टाकलेला षटकातील तिसरा चेंडू 'नो बॉल' होता, या चेंडूवर धाव काढता आली नाही पण संघाला एक धाव मिळाली.

फ्रि हिटचा बाॅल व्हाईड : त्यानंतर, थॉमसने फ्रि हिटचा चेंडू टाकला पण तो 'व्हाईड' होता. त्यामुळे एक धाव मिळाली, त्यानंतर फ्रि हिटचा हाच चेंडू ओशेनला परत टाकावा लागला, या चेंडूवर थाॅमसने षटकार ठोकला म्हणजेच शुन्य चेंडू आठ धावा..वसूल झाल्या.

नंतर 2 नो बाॅल : त्यानंतर पुढचे 2 चेंडू पुन्हा 'नो बॉल' होते, त्यावर शेफर्डने सलग 2 षटकार ठोकले. म्हणजेच एका चेंडूवर 7-7 धावा आल्या, आधीच्या 8 आणि या 14 अशा एकूण 22 धावा वसूल झाल्या.

यामध्ये 3 षटकार, 2 नो बॉल आणि 1 वाईड बॉल यांचा समावेश आहे. ओशेन थॉमसच्या या षटकात एकूण 33 धावा निघाल्या, कारण इफ्तिखार अहमदनेही अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकला.

शेफर्डचा धमाकेदार खेळ

एकट्याच्या 22 धावा: रोमारियो शेफर्ड हा क्रिकेट इतिहासात एकाच चेंडूत तीन षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

तोच थॉमस, तोच विक्रम: ओशेन थॉमस हा एकाच चेंडूत 20 पेक्षा जास्त धावा देणारा जगातील पहिला गोलंदाज बनला आहे.

विस्फोटक खेळी: रोमारियो शेफर्डने 34 चेंडूंमध्ये 73 धावांची तुफानी खेळी केली. त्यामुळे गयाना वॉरियर्सने 200 धावांचा टप्पा ओलांडला. या विक्रमामुळे क्रिकेट जगतात रोमारियो शेफर्डची कामगिरी चर्चेचा विषय ठरली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+