Ravindra Jadeja : रविंद्र जडेजाचा कसोटीमध्ये विक्रम! क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू
Ravindra Jadeja's record : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर भारताला बरेच सामने जिंकून दिले आहेत. एक चांगला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज म्हणून त्याने आपले श्रेष्ठत्व वेळोवेळी सिद्ध केले आहे. आता त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तूरा खोवला गेला आहे.
रवींद्र जडेजाचे नाव इतिहासाच्या पानांवर नोंदवले गेले आहे. त्याने कसोटीत एक मोठा विक्रम केला आहे. असा विक्रम करणारा रविंद्र जडेजा हा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे.

रविंद्र जडेजाने केला हा विक्रम
आयसीसी कसोटी क्रमवारीच्या इतिहासात रविंद्र जडेजा सर्वात जास्त काळ नंबर-वन अष्टपैलू खेळाडू बनला आहे. या ठिकाणी इतर अनेक खेळाडू आले आणि गेले पण जडेजा बराच काळ पहिल्या क्रमांकावर आहे तो आहेच. हा त्याने एक नवीन इतिहास रचला आहे.
रविंद्र जडेजाने काय केला विक्रम
कसोटी क्रिकेटमध्ये नंबर वन अष्टपैलू खेळाडूच्या स्थानावर तो एक दोन महिने नाही तर तब्बल ११५१ दिवसांपासून आहे. म्हणजेच सुमारे तीन वर्षांपेक्षा जास्त काळ तो टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी जडेजाने महत्वपूर्ण अष्टपैलू कामगिरी केली आणि 29.27 च्या सरासरीने 527 धावा केल्या. त्याने 24.29 च्या सरासरीने 48 विकेट्सही घेतल्या. या खेळामुळेच तो क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.
कसोटीतील टॉप 10 अष्टपैलू खेळाडू
- रवींद्र जडेजा - 400 गुण
- मेहदी हसन मिराज - 327 गुण
- मार्को जॅन्सन - 294 गुण
- पॅट कमिन्स - 271 गुण
- शकिब अल हसन - 253 गुण
- जेसन होल्डर - 249 गुण
- जो रूट - 247 गुण
- गस अॅटकिन्सन - 240 गुण
- बेन स्टोक्स - 235 गुण
- ख्रिस वोक्स - 225 गुण
जडेजाने 'या' खेळाडूंना मागे टाकले
उत्तम फलंदाजी आणि धारदार गोलंदाजीच्या जोरावर चित्त्यासारखा चपळ असलेल्या रविंद्र जडेजाने जगातील अनेक मोठ्या खेळाडूंना मागे टाकले आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू जॅक कॅलिस, भारताच्या विश्वविजेत्या संघाचे माजी कर्णधार कपिल देव, पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू इम्रान खान याच्यासारखे खेळाडूंना त्याने मागे टाकले आहे.
इम्रान खान असो की कपिल देव हे त्यांच्या काळातील उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू होते.
2022 मध्ये जडेजा क्रमवारीत अव्वल
400 गुणांसह, जडेजा आयसीसी कसोटी ऑल-राउंडर क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याच्या या विक्रमामुळे त्याला आधुनिक क्रिकेटमधील सर्वात महत्वाच्या खेळाडूत स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे हा खेळाडू 36 वर्षांचा असूनही त्याचा फिटनेस कमालीचा आहे. त्याचा थ्रो थेट सीमारेषेवरून यष्टीपर्यंत येतो.












Click it and Unblock the Notifications