आर. अश्विन अडचणीत? निवृत्तीनंतर 'हा' गंभीर आरोप, TNPLमध्ये वाद उफाळला
भारताचा माजी स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरतोय, पण यावेळी त्याचं नाव एका वादग्रस्त प्रकरणात येतंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अश्विन तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मध्ये सक्रिय आहे, मात्र आता त्याच्यावर बॉल टॅम्परिंगचा आरोप झालाय.

अश्विनवर बॉलशी छेडछाड केल्याचा आरोप का?
14 जून रोजी झालेल्या TNPL सामन्यात डिंडीगुल ड्रॅगन्स संघाकडून खेळणाऱ्या अश्विनवर सेकेम मदुराई पँथर्स संघाने गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला की, अश्विन व त्याच्या सहकाऱ्यांनी चेंडूला चमक आणण्यासाठी टॉवेल वापरला, ज्यावर विशिष्ट प्रकारचं रसायन लावलेलं होतं. अश्विनकडून बॉलच्या नैसर्गिक स्थितीत बदल करण्यात आला असल्याचा दावा करत, त्यांनी TNPL प्रशासनाकडे लिहित स्वरूपात तक्रार दाखल केली आहे.
TNPL व्यवस्थापनाने काय भूमिका घेतली?
TNPL चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसन्ना कन्नन यांनी मात्र या आरोपांना फारसं गांभीर्यानं घेतलेलं दिसत नाही. त्यांनी स्पष्ट केलं की, तक्रार स्वीकारली आहे मात्र, सिद्ध पुरावे मिळाल्याशिवाय कारवाई करता येणार नाही. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ते म्हणाले, "आम्हाला एक औपचारिक तक्रार प्राप्त झाली आहे.
आम्ही संबंधित फ्रँचायझीला सांगितलं आहे की, जर त्यांच्याकडे कोणतेही दृश्य किंवा भौतिक पुरावे असतील, तर ते सादर करावेत. जर ठोस आधार मिळाला, तर चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्यात येईल."
याआधी पंचांशी वाद, आता आणखी एक वाद
काही दिवसांपूर्वी TNPLच्या सामन्यात अश्विन पंचांशी झालेल्या वादामुळेही चर्चेत आला होता. पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्याने हातमोजे मैदानावर फेकले होते, ज्यामुळे त्याला दंडही ठोठावण्यात आला. त्यामुळे अश्विनची वागणूक सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे.
अश्विनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द, आकडेवारीत अफाट यश
रविचंद्रन अश्विन हा भारतीय क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी गोलंदाजांपैकी एक मानला जातो. 2010 साली झिम्बाब्वे विरुद्धच्या टी-20 सामन्यातून त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. पुढील 14 वर्षांत तो भारताच्या फिरकी आक्रमणाचा प्रमुख आधारस्तंभ ठरला.
287 आंतरराष्ट्रीय सामने
765 एकूण बळी
4394 एकूण धावा
या संख्यांमधून अश्विनच्या कौशल्याची आणि सातत्याची प्रचिती येते.
निवृत्तीनंतर मैदानावर खेळ सुरू ठेवत असलेला अश्विन TNPLमध्ये सक्रिय असला तरी, सतत येणाऱ्या वादांमुळे त्याचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. बॉल टॅम्परिंगसारखा आरोप अत्यंत गंभीर आहे, विशेषतः अशा खेळाडूवर ज्याची कारकीर्द अनेकविध विक्रमांनी भरलेली आहे. सध्या सगळ्यांचं लक्ष TNPL प्रशासनाकडे आहे की ते या आरोपांची सखोल चौकशी करतात की नाही.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन!










Click it and Unblock the Notifications