क्रिकेटपटू ऋषभ पंतला अपघातातून वाचविणाऱ्या तरुणाने प्रेयसीसोबत घेतले विष; व्हेलेंटाईन वीकमधील घटना
क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा अपघातात जीव वाचविणाऱ्या तरुणाने त्याच्या मैत्रिणीसोबत विष प्राशन केले. ही घटना प्रेमसंबंधातून घडली. रजत कुमार (वय २५) व मन्नू कश्यप (वय २१) असे या प्रेमियुगुलाचे नाव आहे. या घटनेत तरुणी मन्नू कश्यपचा मृत्यू झाला असून, रजत कुमार अत्यवस्थ आहे. रुरकी येथील एका खासगी रुग्णालयात रजत मृत्यूशी झुंज देत आहे. याच रजनतने अडीच वर्षांपूर्वी ऋषभ पंतचा जीव वाचवला होता.

नेमके काय झाले?
हरिद्वारमधील गुरुकुल नरसनमध्ये डिसेंबर २०२२ मध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा गंभीर अपघात झाला होता. त्यावेळी एका कंपनीतून घरी चाललेल्या रजत कुमार व त्याचा मित्र निशू कुमार यांनी जळत्या कारमधून ऋषभ पंतला बाहेर ओढून काढत, रुग्णालयात दाखल केले होते. रजत व निशू यांनी वेळेवर मदत केल्यामुळे ऋषभ पंतचे प्राण वाचले होते. ऋषभ पंतने उपचारातून बरा झाल्यावर या दोन्ही जिगरबाज तरुणांना स्कूटर भेट दिली होती. शिवाय आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन त्यांचे आभारही मानले होते.
I may not have been able to thank everyone individually, but I must acknowledge these two heroes who helped me during my accident and ensured I got to the hospital safely. Rajat Kumar & Nishu Kumar, Thank you. I'll be forever grateful and indebted 🙏♥️ pic.twitter.com/iUcg2tazIS
— Rishabh Pant (@RishabhPant17) January 16, 2023
रजतचे प्रेयसीसोबत विषप्राशन
दरम्यान, ऋषभ पंतला वाचविणाऱ्या याच रजत कुमारने आपली मैत्रीण मन्नू कश्यप (वय २१) हिच्यासोबत विष प्राशन केले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र या दोघांचीही जात वेगवेगळी असल्याने त्यांच्या लग्नाला घरच्यांनी विरोध केल्याचे सांगितले जाते. या घटनेत मन्नू कश्यपचा मृत्यू झाला तर रजत कुमार अत्यवस्थ आहे.
पोलिसांचे म्हणणे काय?
या प्रकरणाबाबत अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार आली नसल्याचे समजते. पोलिस अधिक्षक सत्यनारायण प्रजापती यांच्या म्हणण्यांनुसार पुरकाजीच्या बुच्चा बस्ती गावातील एक मुलगा व एक मुलीने प्रेमसंबंधातून कुटुंबाने लग्नास नकार दिल्यामुळे आत्महत्या केली. या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार आली नाही. मात्र पोलिस या घटनेचा सर्व अँगलने तपास करत आहे. जे काही पुरावे समोर येतील, त्यानुसार पोलिस कारवाई करतील, असेही एसपींनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications