Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

राजस्थान रॉयल्सच्या संघात दिसेल ‘हा’ नवीन खेळाडू, वैभवसारखी कामगिरी करणार?

आयपीएल २०२५ चा हा हंगाम राजस्थान रॉयल्ससाठी अपेक्षेप्रमाणे गेला नाही. संघ आधीच प्लेऑफमधून बाहेर पडला आहे. दरम्यान, राजस्थानने गुरुवारी जाहीर केले की उर्वरित सामन्यांसाठी जखमी संदीप शर्माच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज नांद्रे बर्गर संघात असेल. गेल्या वर्षी रॉयल्सकडून खेळल्यानंतर बर्गरचा हा रॉयल्ससोबतचा दुसरा हंगाम असेल.

nandre burger replace sandeep sharma

यापूर्वी आयपीएल २०२४ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता आणि ६ सामन्यांमध्ये ७ विकेट्स घेतल्या होत्या. तो ३.५ कोटी रुपयांना आरआरमध्ये सामील झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला बोटाला फ्रॅक्चर झाल्यामुळे संघाचा वेगवान गोलंदाज संदीप हंगामाबाहेर गेला. त्याने राजस्थानसाठी १० सामने खेळले आहेत आणि ९ विकेट्स घेतल्या आहेत.

वैभव सूर्यवंशीने सर्वांनाच केलं आश्चर्यचकीत

१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने ते केले जे आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणीही करू शकले नाही. सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध अवघ्या ३५ चेंडूत शानदार शतक झळकावून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राजस्थान प्लेऑफमधून बाहेर पडला असेल, पण वैभवच्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.

बर्गरच्या कामगिरीवर चाहत्यांच लक्ष

अशा परिस्थितीत, बर्गर सूर्यवंशीसारखे काहीतरी अद्भुत करू शकतो की नाही हे पाहणे बाकी आहे. त्याला चेंडूने आपली छाप पाडण्याची आणि पुढील हंगामासाठी संघात आपले स्थान निश्चित करण्याची संधी असेल. नितीश राणा राजस्थानच्या आगामी सामन्यांमध्येही सहभागी होऊ शकणार नाही. २०२५ च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून नितीश राणा हा एक उत्कृष्ट फलंदाज राहिला आहे.
राणाने ११ सामन्यांमध्ये २१.७० च्या सरासरीने २१७ धावा केल्या.

या हंगामात त्याच्या नावावर दोन अर्धशतके आहेत. गुवाहाटीमध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ३६ चेंडूत ८१ धावांची आणि दिल्लीमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २८ चेंडूत ५१ धावांची खेळी करून राणाने आपली ताकद दाखवून दिली.

प्लेऑफची चुरस वाढली

कोलकाता येथे 7 एप्रिल 2025 रोजी झालेला सामना रोमांचक झाला. या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा शेवटच्या षटकात दोन गडी राखून पराभव केला चेन्नई आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, त्यातच आता कोलकाताचा पराभव करुन या संघाने कोलकाताच्या प्लेऑफच्या मार्गात अडथळे आणले आहेत.

चेन्नईविरुद्ध पराभव झाल्याने केकेआरला त्यांचे उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेतच पण एवढ्यावर थांबून चालणार नाही तर नेट रनरेटही या संघाला चांगला करावा लागेल. इतर संघांच्या निकालांवरही य अवलंबून राहावे लागेल. सध्या हा संघ सहाव्या स्थानावर आहे

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+