Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Birthday special: 'द वॉल' राहुल द्रविडचा आज वाढदिवस, हे 5 रेकॉर्ड जाणून घ्या जे मोडणे अशक्य आहे!

Happy Birthday Rahul Dravid: टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक जागतिक क्रिकेटमध्ये अमुल्य असं योगदान देणारे राहुल द्रविड यांचा आज वाढदिवस आहे. राहूल द्रविड आज शनिवारी 11 जानेवारी रोजी आपला 52 वा वाढदिवस साजरा करत आहे.

त्याची खास टेक्निक आणि शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणारे द्रविडला सर्वात कठीण परिस्थितीतही भारताच्या फलंदाजी सांभाळण्याच्या क्षमतेमुळे "द वॉल" ही उपाधी मिळाली. आज आपण राहूल द्रविड यांच्या कारकिर्दीवर आणि त्याच्या काही मोठ्या विक्रमांवर एक नजर टाकणार आहोत.

rahul dravid

11 जानेवारी 1973 रोजी इंदूर येथे जन्मलेल्या द्रविडचा क्रिकेट प्रवास लहान वयातच सुरू झाला. राहूल यांचे वडील शरद द्रविड यांचा त्याच्यावर मोठा प्रभाव होता. द्रविडने 1991 मध्ये कर्नाटककडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

द्रविडला 1996 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलं

1996 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण करून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलं. द्रविडची कसोटी क्रिकेटमध्ये एक गौरवशाली कारकीर्द आहे. त्याचा प्रचंड संयम आणि दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकून राहण्याची क्षमता असल्यामुळे त्याला द वॉल असं म्हटलं जातं. द्रविडने 16 वर्षांच्या कसोटी कारकि‍र्दीत सर्वाधिक 31,258 चेंडूंचा सामना केल्याचा एक मोठा विक्रम त्याच्या नावावर आहे.

कसोटी सामन्यांमध्ये एकूण 44,152 मिनिटे मैदानावर घालवली

कठीण परिस्थितीत आणि अडचणीत आणणाऱ्या गोलंदाजांना तोंड देण्याची त्याची क्षमता त्याला भारताच्या यशाचा एक प्रमुख खेळाडू म्हणून बनवत होती. क्रिकेट मैदानावर सर्वाधिक 210 झेलचा विक्रम ही त्यांच्या नावावर आहे. प्रचंड शांत आणि संयमी ओळखल्या जाणाऱ्या द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 44,152 मिनिटे मैदानावर घालवली आहेत. हा एक मोठा विक्रम त्याच्या नावावर आहे.

द्रविडच्या कारकिर्दीतील सर्वात प्रतिष्ठित डावांपैकी एका सामन्यात द्रविडने 2004 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या 270 धावांच्या खेळीदरम्यान अविश्वसनीय 740 मिनिटे फलंदाजी केली होती. जी भारतीय फलंदाजाने खेळलेली सर्वात लांब खेळी होती. या सामन्याने त्याच्या इतर असंख्य संस्मरणीय कामगिरीसह जगातील सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळख निर्माण झाली.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करण्याचा विक्रमही दव्रिडच्या नावावर आहे. ज्यामध्ये 88 शतके आहेत, जी भागीदारी उभारण्याची आणि त्याच्या सहकाऱ्यांना पाठिंबा देण्याची त्याची क्षमता दर्शवते.

एकदिवसीय 344 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक विश्वासू खेळाडू म्हणून त्याने एकदिवसीय 12 शतके आणि 83 अर्धशतकांसह 10,889 धावा केल्या आहेत. भारताच्या सर्वात सातत्यपूर्ण मधल्या फळीतील महत्वाचा फलंदाजांपैकी एक म्हणून ओळख मिळाली. 1999 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध सचिन तेंडुलकरसोबत त्याची विश्वविक्रमी 331 धावांची भागीदारी ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळीपैकी एक आहे.

द्रविडने आयपीएलध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे. जरी त्याची आयपीएल कारकीर्द त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीइतकी गौरवशाली नसली तरीही त्याने ज्या संघांसाठी खेळला त्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.

निवृत्तीनंतर द्रविडने अखंडपणे कोचिंग आणि मार्गदर्शनाकडे वळला. भारत अ आणि 19 वर्षांखालील संघांचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी युवा खेळाडूंना घडवलं आहे. जे पुढे सर्वोच्च स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करतील.

राहुल द्रविडचे काही विक्रम येथे आहेत

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू: द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये 31,258 चेंडूंचा सामना केला, जो एक अतुलनीय कामगिरी आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक नसलेल्या व्यक्तीने सर्वाधिक झेल घेतले: द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये 210 झेल घेतले.

सर्वाधिक वेळ मैदानावर: द्रविडने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 736 तास मैदानावर घालवले.

एकदिवसीय आणि कसोटी दोन्हीमध्ये 10,000 पेक्षा जास्त धावा करणारा दुसरा भारतीय: द्रविडने एकदिवसीय सामन्यात 10,889 आणि कसोटीत 13,288 धावा केल्या.

2024 च्या टी-20 विश्वचषकात भारताला विजय मिळवून दिला: 2024 च्या टी-20 विश्वचषक जिंकताना द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+