जगप्रसिद्ध टेनिसपटू राफेल नदालचा टेनिसला अलविदा; 'या' विक्रमांना घातली होती आत्तापर्यंत गवसणी

जगप्रसिद्ध टेनिसपटू राफेल नदाल याने गुरुवारी (10 ऑक्टोबर) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. राफेलचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी धक्का देणाराच होता. आपल्या 19 वर्षांच्या कारकीर्दीत त्याने तब्बल 22 ग्रँण्डस्लॅम विजेतेपद पटकावले. तब्बल दोन दशकं टेनिसवर फक्त त्याचंच साम्राज्य राहिलं. जगातील महान टेनिसपटूंपैकी एक असलेल्या राफेलची निवृत्तीची घोषणा अनेकांना हूरहूर लावणारी ठरली.

2005 मध्ये पहिल्यांदा जिंकली होती फ्रेंच ओपन स्पर्धा

राफेल नदालने आपल्या करियरमध्ये विक्रमी 14 वेळा फ्रेंच ओपन, 4 वेळा अमेरिकन ओपन, दोन वेळा विम्बल्डन आणि दोन वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा गाजवली. 2022 हे वर्ष नदालसाठी खूपच भन्नाट राहिले. ज्या कोर्टवर त्याला फार यश मिळालेले नाही, त्या स्पर्धेत त्याने दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले. या वर्षीच्या जानेवारीत पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा झाली. या ऑस्ट्रेलीयन ओपन स्पर्धेत त्याने डॅनियल मेदवदेवला पराभूत करत फेडरर आणि जोकोविच यांना मागे टाकले होते. त्यावर्षी नादालने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली.

Rafael Nadal Retirement

टेनिसवर फेडरर, नादाल व जोकोविचचंच राज्य

2022 मध्ये निवृत्त झालेल्या फेडररने आत्तापर्यंत 20 विजेतेपदे जिंकली होती. तर जोकोविचने 23 विजेतेपदांवर आपले नाव कोरले होते. आज निवृत्तीची घोषणा करणाऱ्या राफेलने 22 विजेतेपद जिंकली. या तिघांनी आत्तापर्यंत एकूण 65 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. तिन्ही सुपरस्टार्सनी कारकिर्दीतील चारही ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. त्यातही नदालने अजून एक विक्रम आपल्या नावे केला आहे. नदालने ऑलिम्पिक एकेरी आणि दुहेरीचे सुवर्णही जिंकले आहे. फेडररला ही किमया करता आली नव्हती.

नदालने 14 फ्रेंच ओपन विजेतेपदांव्यतिरिक्त 2009 आणि 2022 मध्ये यूएस ओपन चार वेळा, विम्बल्डन दोनदा आणि ऑस्ट्रेलियन ओपन दोनदा जिंकले आहे. त्याने फेडरर आणि जोकोविचला पराभूत करून 20 पैकी 11 ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळवली आहेत. नदाल, फेडरर आणि जोकोविच या तिघांनीही गेल्या दोन दशकांत टेनिसची लोकप्रियता शिखरावर नेऊन ठेवली आहे. विशेष म्हणे नदालने आत्तापर्यंत 30 वेळा ग्रँडस्लॅमच्या फायनलपर्यंत मजल मारली आहे. त्यात 22 वेळा त्याला यश आले. आठ वेळा तो अगदी थोडक्यात पराभूत झाला.

सर्वाधिक ग्रँडस्लॅमचा विक्रम महिलांच्या नावे

टेनिस जगतात सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम हा महिला टेनिस स्टारच्या नावे आहे. ऑस्ट्रेलियन मार्गरेट कोर्टने (24), सेरेना विलियम्स (23) आणि स्टेफी ग्रॉफने (22) वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. मात्र त्यातही राफेलचं फायनल विनिंग पर्सेंटेज या सर्वांपेक्षा भारीच आहे. राफेल नदालने 30 वेळा ग्रँडस्लॅचच्या फायनलमध्ये पोहचून 22 वेळा जेतेपद मिळवले आहे. 31 वेळा फायनल खेळलेल्या फेडरर आणि जोकोविच यांनी प्रत्येकी 20-20 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे. नदालने फ्रेंच ओपन 14 वेळा, अमेरिकन ओपन 4 वेळा, ऑस्ट्रेलियन ओपन 2 वेळा, विंम्बल्डन 2 दोन वेळा जिंकली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+