बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू अडकली लग्नबंधनात; लग्नातील पहिलाच फोटो आला समोर
माजी वर्ल्ड चॅम्पियन आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने २२ डिसेंबर रोजी व्यंकट दत्ताबरोबर लग्नगाठ बांधली. या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. तिने स्वतः तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले नसले तरी, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी तिच्या लग्नाचा फोटो शेअर करत, तिला शुभेच्छा दिल्या. हा पहिलाच फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

सिंधूने बांधली लग्नगाठ
पीव्ही सिंधूने काल म्हणजेच २२ डिसेंबरला बिझनेसमन व्यंकट दत्ता याच्यासोबत लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील उदयपूर येथे हा शाही विवाह सोहळा पार पडला. दाक्षिणात्य हिंदू रितिरिवाजाप्रमाणे हा सोहळा झाला. या लग्नाचे फोटो अद्याप या दोन्ही कुटुंबाने शेअर केले नसले तरी, मंत्री शेखावत यांनी हा फोटो शेअर केला.
काय आहे फोटोत
या फोटोत मंत्री शेखावत या दाम्पत्याला शुभाशिर्वाद देताना हात जोडताना दिसत आहेत. सिंधूने चंदेरी रंगाची साडी घातली आहे. त्यावर भरजरी दागिनेही घातले आहेत. तिचा पती वेंकट दत्ता याने त्याच रंगसंगतीचा कुर्ता व धोती घातलेली आहे.
Pleased to have attended the wedding ceremony of our Badminton Champion Olympian PV Sindhu with Venkatta Datta Sai in Udaipur last evening and conveyed my wishes & blessings to the couple for their new life ahead.@Pvsindhu1 pic.twitter.com/hjMwr5m76y
— Gajendra Singh Shekhawat (@gssjodhpur) December 23, 2024
काय आहे फोटोची कॅप्शन
या फोटोखाली शेखावत यांनी लिहले आहे की, 'काल उदयपूरमध्ये वेंकट दत्ता साईसोबत आपली बॅटमिंटन चॅम्पियन, ऑलिम्पियन पी. व्ही. सिंधूच्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहून मला खूप आनंद झाला. मी या नवविवाहित जोडप्याला त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला.












Click it and Unblock the Notifications