Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

PKL : प्रो कबड्डी लीगमध्ये आजचा सामना कोणासोबत,जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

Pro Kabaddi League 2024 : गेल्या सामन्यात यू मुंबाला पराभूत केल्यानंतर पुणेरी पलटण आज पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसणार आहे. पुणेरी पलटणचा सामना आता गुजरात जायंट्सशी होणार आहे. आजचा पहिला सामना या दोन संघांमध्ये रंगणार आहे. यानंतर दुसरा सामना बंगळुरू बुल्स आणि तमिळ थलायवास यांच्यात होणार आहे.

पुणेरी पलटण चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने पलटनसमोरील काम गुजरातसाठी सोपे वाटत नाही. पलटणचा संघही गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. पलटनने आतापर्यंत खेळलेल्या 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. गतविजेत्यासारखी कामगिरी केली आहे. पलटणचा संघही गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. पलटनने आतापर्यंत खेळलेल्या 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. गतविजेत्यासारखी कामगिरी केली आहे.

Puneri Paltan vs Gujarat Giants

गुजरातचा हा पाचवा सामना असला तरी आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांमध्ये कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. गुजरातने चारपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. तसेच गुणतालिकेत अकराव्या स्थानावर आहे. अशा स्थितीत या सामन्यात पलटनचे पारडे जड असल्याचं म्हणता येईल.

सध्या टेबलच्या तळाशी असलेल्या बंगळुरू बुल्सचा सामना यजमान तामिळ थलायवासशी होणार आहे. परदीप नरवालच्या नेतृत्वाखाली बुल्सने या मोसमात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. नरवालसारखा तगडा कर्णधार असूनही संघाचे नशीब चमकू शकला नाही नाही. बुल्सचा हा सातवा सामना असून आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांमध्ये त्यांना एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. आज त्यांना पुन्हा विजयाची संधी आहे. तामिळ थलायवासने पाचपैकी दोन सामने जिंकून गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. या सामन्यात थलायवासचा वरचष्मा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+