Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Pro Kabaddi League: आज प्रो कबड्डी लीगच्या अंतिम फेरीत कोण होणार चॅम्पियन? या दोन संघांमध्ये स्पर्धा

Pro Kabaddi League Final: प्रो कबड्डी लीगचा अंतिम फेरीचा आज सामना होणार आहे. प्रदीर्घ काळ लीग टप्पा पार केल्यानंतर या स्पर्धेने बाद फेरीत प्रवेश केला आणि आता अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम सामना दोन बलाढ्य संघांमध्ये होणार आहे. चॅम्पियन संघ कोण होणार आजच्या अंतिम सामन्यातूनच कळेल.

गेल्या मोसमात पुणेरी पलटण आणि हरियाणा स्टीलर्स यांच्यात अंतिम सामना झाला होता. यावेळीही एक संघ त्याच फायनलमधील आहे. हरियाणा स्टीलर्सने यावेळीही अंतिम फेरी गाठण्यात यश मिळवलं आहे. आता दुसरा संघ पटना पायरेट्स आहे. पाटणा याआधीही या स्पर्धेत चॅम्पियन ठरला आहे.

Pro Kabaddi League 2024

पटना पायरेट्स चौथ्या विजेतेपदासाठी उतरेल. हरियाणा पहिल्या विजेतेपदाच्या शोधात आहे. मोठ्या संघांना मागे टाकत हरियाणाने यंदाच्या मोसमात आपला ठसा उमटवला आहे. गेल्या मोसमात झालेला पराभव विसरून हरियाणा स्टीलर्सने या मोसमात येऊन धडक मारत पुन्हा फायनलचे तिकीट मिळवलं आहे.

प्रो कबड्डी लीगच्या अंतिम फेरीत कोण बाजी मारणार?

दोन्ही संघांचा विचार केला तर हरियाणा स्टीलर्सचा वरचष्मा आहे. यामागचे एक कारण म्हणजे साखळी फेरीत पटनाचा हरियाणाकडून पराभव झाला आहे. अशा स्थितीत हरियाणा स्टीलर्सलाचा आत्मविश्वास वाढला आहे. पटनाची कामगिरी या हंगामात चांगली झाली असून हरियाणाने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

प्रो कबड्डी लीगचा फायनल कधी आणि कुठे पाहायचा

भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. पुण्यात होणाऱ्या या सामन्यातून स्पर्धेच्या अकराव्या हंगामातील चॅम्पियन कोण होणार हे स्पष्ट होईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+