ऑरेंज-पर्पल कॅपसाठी भारतीय आणि परदेशी खेळाडूंमध्ये 'काटे की टक्कर', जाणून घ्या ताजी आकडेवारी
आयपीएल 2025 चा निम्मा प्रवास संपला आहे. दरदिवशी सामना संपल्यानंतर पॉइंट्स टेबल बदलत आहे. कालच्या सामन्यात पंजाब किंग्जने आरसीबीचा पाच विकेट्सने पराभव करून पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. पावसामुळे खेळावर व्यत्य आल्यामुळे आरसीबीसाठी हा सामना कठीण होता. कमी षटकांत जास्त धावा करण्याच्या प्रयत्नात त्यांनी आपले विकेट लवकर गमावल्या.
या सामन्यात आरसीबीचे फलंदाज संघर्ष करताना दिसले तर पंजाबने परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेतला. या विजयामुळे पंजाब किंग्जला प्लेऑफकडे वाटचाल करण्यास मदत झाली आहे. दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे तरीही अनेक संघ प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही संघर्ष करत आहेत. आरसीबीच्या नुकताच झालेल्या पराभवामुळे अव्वल चार संघांचे स्थान डळमळीत झाले आहे तर गुजरात, लखनऊ आणि कोलकाता संघाच्या कामगिरीमुळे पॉइंट्स टेबलमध्ये बद्दल होत आहेत.

1. दिल्ली कॅपिटल्स (DC): संघाने आतापर्यंत 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. त्यांचा संघ 10 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांचा रनरेट +0.744 आहे.
2. पंजाब किंग्ज (PBKS): पंजाबने 6 पैकी 4 सामने जिंकून 8 गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रन रेट +0.172 आहे, ज्यामुळे त्यांचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे.
3. गुजरात टायटन्स (GT): गुजरात टायटन्सने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. हा संघ 8 गुणांसह तिस-या क्रमांकावर आहे. त्यांचा नेट रन रेट +1.081 आहे, जो इतर संघांपेक्षा जास्त आहे.
4. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB): आरसीबीने 7 पैकी 4 सामने जिंकून 8 गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रन रेट +0.446 आहे, ज्यामुळे त्यांचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे.
5. लखनऊ सुपर जायंट्स (LSG): लखनऊने 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. त्याना 8 गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रन रेट +0.086 आहे, ज्यामुळे त्यांचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
6. कोलकाता नाईट रायडर्स (KKR): केकेआरने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत .त्यांना 6 गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रन रेट +0.547 आहे, ज्यामुळे त्यांचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे.
7. मुंबई इंडियन्स (MI): मुंबईने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत.त्यांना 6 गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रन रेट +0.239 आहे, ज्यामुळे त्यांचा संघ सातव्या क्रमांकावर आहे.
8. राजस्थान रॉयल्स (RR): राजस्थानने 7 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यांना 4 गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रन रेट -0.714 आहे, ज्यामुळे त्यांचा संघ आठव्या क्रमांकावर आहे.
9. सनरायझर्स हैदराबाद (SRH): SRH ने 7 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यांना 4 गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रन रेट -1.217 आहे, ज्यामुळे त्यांचा संघ नवव्या क्रमांकावर आहे.
10. चेन्नई सुपर किंग्ज (CSK): CSK ने 7 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यांना 4 गुण मिळवले आहेत. त्याचा नेट रन रेट -1.276 आहे, ज्यामुळे त्यांचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे.
IPL 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 फलंदाज
निकोलस पूरन (LSG)- 357
साई सुदर्शन (GT) - 329
मिचेल मार्श (LSG) - 295
सुर्यकुमार यादव (MI)- 265
श्रेयस अय्यर (PBKS)- 250
पर्पल कॅपच्या शर्यतीत असलेल्या टॉप 5 गोलंदाज
नूर अहमद (CSK)- 12
जोश हेझलवूड (RCB)-12
कुलदीप यादव (DC)- 11
खलील अहमद (CSK)- 11
हार्दिक पांड्या (MI)- 11












Click it and Unblock the Notifications