नीरज चोप्रा ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये! कुस्तीपटू विनेश उपांत्य फेरीत, युक्रेनच्या ओक्सानाला लोळवलं
नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक 2020 चा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. तर दुसरीकडे, किशोर जेना भालाफेकच्या गट-अ पात्रता फेरीत 9 व्या स्थानावर राहिला. या स्पर्धेचा फायनलचा सामना 8 ऑगस्ट रोजी होणार आहे. आता त्याचा मुख्य प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा अर्शद नदीम असणार आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला अद्यापही सुवर्णपदकाची वाट पाहावी लागत असून केवळ तीनच कास्यपदक भारताच्या खेळाडूंनी मिळवले आहेत. त्यामुळे अजूनही पदकाचा दुष्काळच असून आज तरी भारताला पदक मिळेल का हे पाहावे लागणार आहे. चला तर आज अकराव्या दिवशी भारताच्या कोणत्या खेळाडूचे सामने कधी आणि कुणाविरुद्ध आहेत हे जाणून घेऊया.

विनेश फोगाटनं खेचून आणला विजय
कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं आज उपांत्य फेरीत युक्रेनच्या ओक्सानाला लोळवलं. तिनं सात विरुद्ध चार अशा गुणांनी विजय मिळवला. ओक्सानाही ऑलिम्पिक सुवर्णविजेती खेळाडू असून तिचा दावाच विनेशनं विजय मिळवत संपुष्टात आणला. आता विनेश सेमीफायनलमध्ये खेळणार आहे.
लक्ष्यचा पराभव
सोमवार म्हणजे 5 ऑगस्ट रोजी, भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष एकेरी गटात कांस्यपदक जिंकण्यापासून वंचित राहिला. त्याने सपशेल निराशा केली. याशिवाय महेश्वरी चौहान आणि अनंतजित सिंग नारुका या नेमबाजी जोडीलाही कांस्यपदक जिंकता आले नाही.

आजचे सामने
भारतीय खेळाडू आज ऍथलेटिक्स, कुस्ती, टेबल टेनिस आणि हॉकीमध्ये सहभागी होतील. नीरज चोप्राही आपल्या खेळाला आज सुरुवात करणार आहेत. पात्रता फेरीत नीरज चोप्रा आणि किशोर जेना आज पात्रता फेरीत सहभागी होतील.
नीरज चोप्रा, किशोर जेनाचे आज सामने
टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राला गट-ब मध्ये ठेवण्यात आले आहे, त्याचा मॅच भारतीय वेळेनुसार दुपारी 3:20 वाजता सुरू होईल. त्याचा सहकारी किशोर जेना अ गटात आहे आणि तो भारतीय वेळेनुसार दुपारी 1:50 पासून स्पर्धा करेल. जर ते पात्रता फेरीतून पुढे झाले, तर ते 8 ऑगस्ट रोजी रात्री 11:00 वाजता अंतिम फेरीत भाग घेतील.
भारतीय पुरुष हॉकी संघाला संधी
भारतीय पुरुष हॉकी संघाला आज विजयाची संधी आहे, रात्री 10.30 वाजता सुरू होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांची गाठ जर्मनीशी होणार आहे. भारताने नियमित वेळेत 1-1 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनचा 4-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.
या भारतीय खेळाडूंवरही नजर
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट 50 किलो गटात दुपारी 3 वाजता तिच्या मोहिमेला सुरुवात करेल.
टेबल टेनिसमध्ये, भारताचा पुरुष संघ 16 च्या फेरीत चीनशी दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे.
किरण पहल हीट-5 मध्ये सातव्या स्थानी राहिल्यानंतर दुपारी 2:50 वाजता महिलांच्या 400 मीटर शर्यतीत (रिपेचेज) सहभागी होईल.
भारताच्या नावावर तीन पदके
भारताने आतापर्यंत पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये तीन कांस्य पदके जिंकली आहेत. मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर पिस्तुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि सरबज्योत सिंगसह मिश्र स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये स्वप्नील कुसाळेनेही कांस्यपदक पटकावले आहे.












Click it and Unblock the Notifications