बिग न्यूज: हाॅकीत भारताने रचला इतिहास! पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्पेनला हरवत कांस्यपदक जिंकलं

नवी दिल्ली - भारतानं पॅरिस ऑलम्पिकमध्ये इतिहास रचला असून स्पेनला हरवत कांस्यपदक जिंकलं आहे. हा भारताचा अभुतपूर्व विजय आहे. कारण भारताचा सेमीफायनलमध्ये पराभव झाला होता. त्यामुळे समस्त भारतीयांची निराशा झाली हेोती पण कांस्यपदकासाठी भारताच्या आशा जीवंत होत्या, आज कांस्यपदक जिंकून भारतीय खेळाडूंनी त्या पूर्ण केल्या.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने दोन गोल केले. हाफ टाइमपर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. हरमनप्रीत सिंगने 30 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. त्याने 33 व्या मिनिटालाही पेनल्टीवरही गोल केला. स्पेनसाठी एकमेव गोल मार्क मिरॅलेस पोर्टिलोने 18व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर केला.

Paris Olympics 2024 India Harmanpreet Singh vs Spain Hockey Match

भारतीय खेळाडूंचं सेलिब्रेशन

भारतीय खेळाडूंनी विजय होताच सेलिब्रेशन केलं. समस्त भारतीयांसाठी हा आनंद गगनात न मावणारा आहे. आज भारतीय वाॅल अर्थात पीआर श्रीजेशचा अंतीम सामना होता. त्याला कांस्यपदकाची भेट देत भारतानं या विजयाचं सेलिब्रेशन केलं.

भारताला 2-1 अशी आघाडी

भारत आणि स्पेन यांच्यात कांस्यपदकाची लढत आज झाली. हाफ टाईमपर्यंत स्कोअर 1-1 असा बरोबरीत होता. भारतीय कर्णधार हरमनप्रीतने दुसऱ्या सत्राच्या अखेरच्या मिनिटाला अर्थात 30 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर पुन्हा एक गोल हरमनप्रित याने करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राहीली आणि भारत विजयी ठरला.

तत्पूर्वी, 18व्या मिनिटाला मार्क मिरालेस पोर्टिलोने पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला. सेमीफायनलचा सामन्यावर बंदी घातलेला भारतीय बचावपटू अमित रोहिदास स्पेनविरुद्ध खेळत आहे. तर अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना होता.

भारताने स्पेनवर विजय मिळवत ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. आता जर्मनी आणि नेदरलँड्स यांच्यात रात्री 10.30 पासून सुवर्णपदकासाठी सामना होणार आहे.

सामन्याचे अपडेट्स..

हाफ टाईममध्ये दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत, हरमनप्रीतचा गोल

भारतीय संघाने बरोबरीचा गोल केला आहे. सामन्याच्या 30व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल केला. हा त्याचा नववा गोल आहे. या गोलनंतर हाफ टाईमपर्यंत 1-1 अशी बरोबरी होती.

स्पेनला पेनल्टी कॉर्नर मिळाला

28व्या मिनिटाला स्पेनच्या बोर्जा लॅकेलने गोलपोस्टवर हल्ला चढवला, तो बचावला, पण स्पेनला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, पीआर श्रीजेशने आपले कसब दाखवत स्पेनचा हल्ला परतवला. भारतीय खेळाडूंनी पलटवार केले. 24 व्या मिनिटाला ललित आणि हार्दिकने मागोमाग हल्ले केले. पण ते गोल करू शकला नाही.

स्पेनला 21 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर

गोल झाल्यानंतर लगेचच स्पॅनिश संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. याचा परिणाम गोलमध्ये झाला नाही. येथे गोलरक्षक पीआर श्रीजेशने शानदार बचाव केला.तत्पुर्वी पोर्टिलोने स्ट्रोकवर केलेल्या गोलमुळे भारत 0-1 ने पिछाडीवर होता. स्पेनच्या संघाला 18व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोक देण्यात आला. मार्क मिरालेस पोर्टिलोने यावर हा गोल केला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+