Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नीरजची सुवर्णपदकाची संधी हुकली! रोप्यपदक मिळवलं, ऑलिम्पिक रेकार्डसह पाकिस्तानच्या नदीमला गोल्ड

Paris Olympics Neeraj Chopra News : भारताचा सुपरस्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याचं सुवर्णपदक थोडक्यात हुकलं असून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याला रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं गोल्ड मिळवलं.

अंतिम फेरीत नीरजसमोर ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स, जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि पाकिस्तानच्या अर्शद नदीमचं कडवं आव्हान होतं. 26 वर्षीय नीरजने दोन दिवसांपूर्वीच पात्रता फेरीत पहिल्याच प्रयत्नात 89.34 मीटर भाला फेकून पहिल्यास्थानी राहीला होता. या आधी 2021 मध्ये नीरज चोप्रानं टोकीया ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं.

paris-olympics-india-neeraj-chopra-vs-pakistan-arshad-nadeem-javelin-final-match-latest-updates

अपडेट्स

  • सहाव्या फेरीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं मिळवलं सुवर्णपदक, 92.97 मीटर केला थ्रो.
  • सहाव्या फेरीतही नीरज दुसऱ्या क्रमांकावर रौप्य मिळवलं.
  • पाचव्या फेरीत नीरजचा फाऊल
  • नीरजचा चौथ्या फेरीत फाऊल
  • टाॅप - 8 भालाफेकपटूंचा खेळ सुरु.
  • नीरज चोप्रा यानं त्याचा तिसरा थ्रो डाऊन होता. तरीही नीरज नदीमनंतर दुसरा
  • नीरज चोप्रा यानं दुसरा थ्रो 89.45 मीटर भालाफेक केली, हा या सीजनचा बेस्ट परफार्मन्स आहे.
  • पाकीस्तानच्या अर्शद नदीमनं 110 प्रति किलोमीटर वेगानं 92.97 मीटर भाला फेकून ऑलिम्पिक रेकार्ड केला आहे.
  • नीरजचा पहिला थ्रो फाऊल

नीरजचा पहिला थ्रो फाऊल

नीरज चोप्राचा पहिला थ्रो फाऊल झाला आहे. त्याच्याआधी जर्मनीचा ज्युलियन वेबर आणि पाकिस्तानचा अर्शद नदीम यांनी फाऊल थ्रो केले आहेत.

पात्रता फेरीत चमकदार कामगिरी

भारतीय खेळाडू नीरज चोप्रा सुवर्णपदकासाठी आज लढणार आहे. पात्रता फेरीत नीरज चोप्राने चमकदार कामगिरी करत एकाच प्रयत्नात सर्वांना पराभूत केले. आता फायनमध्ये नीरजला आपला सर्वोत्तम खेळ दाखवण्याची संधी आहे.

फायलनमध्ये 'थ्रो'ची एकदाच असते संधी

नीरजचा सामना भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 11.55 वाजता सुरू झाला. या सामन्यासाठी नीरज पूर्णपणे तयार आहे. भाला फेकण्यासाठी मिळालेल्या प्रयत्नांमध्येही तफावत आहे. पात्रता फेरीत खेळाडूंना फक्त तीन संधी मिळतात पण अंतिम फेरीत आणखी एक संधी असते. अंतिम स्पर्धेसाठी, खेळाडूला एकूण सहा वेळा भालाफेक करण्याची संधी मिळते. सर्व प्रयत्नांमधील शीर्ष अंतर मोजले जाते.

नीरजसमोर 11 खेळाडूंचे आव्हान

पात्रता फेरीदरम्यान दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. गट अ आणि ब गटात प्रत्येकी 16 खेळाडूंना स्थान देण्यात आले. यानंतर एकूण 12 नावांना पुढे जाण्याची संधी मिळाली. नीरजसमोर एकूण 11 खेळाडू असतील, ज्यांना तो पराभूत करण्याचा प्रयत्न करेल. पात्रता फेरीतील सर्व 32 खेळाडूंमध्ये नीरजची भालाफेक सर्वात पुढे गेली. त्याने 89.34 मीटर भाला फेकत अव्वल स्थान पटकावले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+