Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मनू भाकरनं ऑलम्पिकमध्ये कास्यपदक जिंकल्यानंतर तिच्या वडिलांची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले...

मुंबई - मनू भाकर हिनं भारतासाठी पहिलं पदक जिंकून दिलं. नेमबाजीत तिनं कास्यपदकावर नाव कोरलं असून ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

एनआयने तिचे वडिल रामकिशन भाकर यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी आपल्या लाडक्या लेकीसाठी पहिली प्रतिक्रिया दिली.

Paris Olympics bronze medalist shooter Manu Bhakar s father ramkishan bhakers first reaction

'माझ्यापेक्षा देशवासियांना जास्त आनंद'

मनू भाकर हिचे वडिल रामकिशन भाकर म्हणाले, माझ्यापेक्षा माझ्या सोसायचीचे लोकच जास्त खूश झाले आहेत. पूर्ण देश आज आनंदी झाला आहे.मनूने ऑलम्पिक मेडलने जी सुरुवात केली. अजून मनूचे काही इव्हेंट्स बाकी आहेत. मनूच्या विजयाने मी देशवासीयांचे आभार मानतो. त्यांनी प्रत्येक क्षणाला साथ दिली. विशेषतः पत्रकार आणि माध्यमांनी मनूचा आत्मविश्वास वाढवला. तिला सपोर्ट केला.

..म्हणून मनूचा आत्मविश्वास वाढला

रामकिशन भाकर म्हणाले, मनुला प्रत्येक कानाकोपऱ्यातून मदत मिळाली. क्रीडा मंत्रालयाकडून, खेळ विभाग आणि इतरांनीही तिला मदत केली. जसपाल राणा यांच्या प्रशिक्षणामुळे मनूचा आत्मविश्वास वाढला.

'..पापा पुढे नाही खेळणार'

रामकिशन भाकर म्हणाले, देशवासीयांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे हे शक्य झालं. मनू २०१६ ला दहावीला होती तेव्हापासून तिला प्रशिक्षण दिलं जात होतं. मनू विचार करीत होती की, काही दुसरं करायचं ती मनूची जुनी सवय आहे. नॅशनल जिंकल्यानंतर ती आम्हाला म्हणाली होती की पापा मी आता पुढे नाही खेळणार...पण आम्ही तिच्या या म्हणण्याकडं दुर्लक्ष केलं होतं.

मनूचा फोन बंद, संपर्कानंतर शुभेच्छा देईल

मनूचे वडिल म्हणाले की, तिचा फोन बंद आहे, तिच्याशी संपर्क साधल्यानंतर मी तिला शुभेच्छा देईल.देशवासीयांनी तिला टाॅनिक दिलं त्यामुळे ती पुढे अधिक चांगलं खेळेल. देशात शुटींगसाठी अनेकजण सराव करतात, हरियानात जवळपास वीस हजार खेळाडू सराव करतात, त्यांनी सातत्य ठेवावं असं मी म्हणतो. मनूने अनेक गेम चेंज केले. कराटे, स्केटींग, बाॅक्सिंगमध्येही तिने खेळ केलेला आहे.

मनू भाकरचं आंतरराष्ट्रीय पदार्पण 2017 मध्ये झालं होतं. यानंतर तिनं लवकरच आपल्या कामगिरीने प्रभावित केलं. 2018 च्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत तिनं सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला नेमबाज ठरली. याशिवाय तिनं नेमबाजी विश्वचषकातही सुवर्णपदक पटकावले होते.

2018 मध्ये, वयाच्या 16 व्या वर्षी, तिनं ISSF विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. यानंतर ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मनूनं 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक जिंकलं. यानंतर त्याने जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+